कोल्हापुरात घराला लागली भीषण आग, गॅस सिलेंडरचा झाला स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:18 IST2026-01-06T13:17:49+5:302026-01-06T13:18:53+5:30
अग्निशमन दलाच्या तीन बंबांकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

कोल्हापुरात घराला लागली भीषण आग, गॅस सिलेंडरचा झाला स्फोट
कोल्हापूर: कोल्हापुरातील शाहूनगर परिसरातील एका घराला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. घराला अचानक लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट आहे.
आगीमुळे घरातील गॅस सिलेंडरचा ही स्फोट झाला. आगीत घर संपूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांकडून ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रापंचिक मोठे नुकसान झाले.