कोल्हापुरात रत्नागिरी हापूस दाखल, सौद्यात पहिल्या पेटीला किती मिळाला दर... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 16:31 IST2026-02-21T16:27:19+5:302026-02-21T16:31:34+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा पार पडला. या सौद्यामध्ये १५ आंब्यांच्या ...

कोल्हापुरात रत्नागिरी हापूस दाखल, सौद्यात पहिल्या पेटीला किती मिळाला दर... जाणून घ्या
कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज रत्नागिरी हापूस आंब्याचा पहिला सौदा पार पडला. या सौद्यामध्ये १५ आंब्यांच्या पेटीला सहा हजार एकवीस रुपये इतका भाव मिळाला. रत्नागिरीतील बेर्डे या शेतकऱ्याकडून आकाश तोडकर या व्यापाऱ्याकडे आलेल्या आंब्याची पहिली पेटी प्रसाद वळंजु यांनी घेतली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
यंदा हवामान बदलाचा आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. यावर्षी फुलोरा मोठ्या प्रमाणात आला होता; परंतु अपेक्षित फळधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशी आली आहे. मात्र हंगामातील पहिला आंबा आज रत्नागिरीहून कोल्हापुरात दाखल झाला. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने दरामध्ये तेजी पाहायला मिळाली.
कोल्हापूर बाजार समितीत रत्नागिरी हापूस १५ आंब्यांच्या पेटीला सहा हजार एकवीस रुपये इतका भाव मिळाला. यामुळे आंबा बागायदारांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. तर खवय्या कोल्हापूरकरांना आंब्याची चव चाखता येणार आहे. साधारण मे महिन्यापर्यंत आंब्याचा दर हा जास्त प्रमाणातच पाहायला मिळेल असा अंदाज आहे.