गडहिंग्लज तालुक्यात ९६ नवे कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST2021-05-03T04:19:55+5:302021-05-03T04:19:55+5:30

गडहिंग्लज शहर तालुक्यात दोन दिवसांत तब्बल ९६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या ७३४ वर पोहोचली आहे. ...

96 new corona affected in Gadhinglaj taluka | गडहिंग्लज तालुक्यात ९६ नवे कोरोनाबाधित

गडहिंग्लज तालुक्यात ९६ नवे कोरोनाबाधित

गडहिंग्लज शहर तालुक्यात दोन दिवसांत तब्बल ९६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या ७३४ वर पोहोचली आहे.

तालुक्यात ३९३ रुग्ण उपचार घेत असून ३१३ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या महिनाभरात २८ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रविवारी (दि. २) अँटिजेन रॅपिड टेस्टमध्ये शहरातील ११ जण बाधित, तर ग्रामीण भागात २२ रुग्ण आढळून आले.

गेल्यावर्षी एका दिवसात ७ कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रविवारी शहरातील स्मशानभूमीत तब्बल ८ बाधित मृतांवर पालिकेचे कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.

------------------

* केवळ ५ ऑक्सिजन बेड शिल्लक

गडहिंग्लज शहर व तालुक्यात मिळून रविवारी (दि. २) केवळ २ ऑक्सिजन बेड शिल्लक होते. नॉन ऑक्सिजनचे ८८ बेड व आयसीयूचे २ बेड मिळून ९५ बेड शिल्लक होते. एकूण ४६३ पैकी ३६८ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 96 new corona affected in Gadhinglaj taluka