साताऱ्यातील टोळीकडून २४ लाखांच्या मुद्देमालासह ९१ किलो गांजा जप्त, कोल्हापुरात तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:50 IST2025-01-23T12:48:24+5:302025-01-23T12:50:34+5:30
कोल्हापूर : गोव्यात विक्रीसाठी १० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ अटक केली. त्याच्या चौकशीतून ...

साताऱ्यातील टोळीकडून २४ लाखांच्या मुद्देमालासह ९१ किलो गांजा जप्त, कोल्हापुरात तिघांना अटक
कोल्हापूर : गोव्यात विक्रीसाठी १० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ अटक केली. त्याच्या चौकशीतून सातारा जिल्ह्यातील गांजा तस्करांच्या टोळीचा छडा लागला. पोलिसांनी टोळीकडून ९१ किलो गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाइल असा २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली.
फैय्याज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, जि. सातारा), सोहेल सलीम मोमीन (३३, रा. उंब्रज, जि. सातारा) आणि समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख (२१, रा. रहीमतपूर कोरेगाव, जि. सातारा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील फैय्याज मोकाशी हा गोव्यातील सॅम नावाच्या व्यक्तीला गांजा पोहोचवण्यासाठी दुचाकीवरून निघाला असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ सापळा रचून मोकाशी याला अटक केली. मोकाशीकडे १० किलो गांजा मिळाला. हा गांजा सोहेल मोमीन याच्याकडून आणल्याचे त्याने चौकशीत सांगितले.