काँग्रेसचे ८/९ जण कमळाच्या चिन्हावर लढण्यास तयार, मंत्री उदय सामंत यांचे सतेज पाटील यांना प्रत्युत्तर
By समीर देशपांडे | Updated: January 2, 2024 19:10 IST2024-01-02T19:08:57+5:302024-01-02T19:10:27+5:30
कोल्हापूर : काँग्रेसचे ८ ते ९ नेते कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यांची यादी माझ्याकडे आहे असा ...

काँग्रेसचे ८/९ जण कमळाच्या चिन्हावर लढण्यास तयार, मंत्री उदय सामंत यांचे सतेज पाटील यांना प्रत्युत्तर
कोल्हापूर: काँग्रेसचे ८ ते ९ नेते कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहेत. त्यांची यादी माझ्याकडे आहे असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लगावला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेतील अनेकजण लोकसभेसाठी कमळ चिन्हावर लढण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले होते. याबाबत पत्रकारांनी सामंत यांना विचारले असता त्यांनी वरील प्रत्युत्तर दिले.
सामंत म्हणाले, ज्या पध्दतीने आमच्यातील सात जणांनी कमळावर निवडणूक लढवण्याची पत्रे दिली आहेत असे पाटील यांचे म्हणणे आहे. तसेच काँग्रेसमधील कोण कोण कमळ चिन्हावर लढायला तयार आहेत याची यादी माझ्याकडेही आहेत. कोण कोणाला कुठे भेटले याचा तपशीलही माझ्याकडे आहे. तो मी चार दिवसात जाहीर करीन.