शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘करमणुकी’साठी ८०० कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

करमणूक कर : शासनाकडून विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित

राम मगदूम - गडहिंग्लज -गतवर्षी राज्यात ७२५ कोटी करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात ७२५ कोटी ८१ लाख इतकी विक्रमी वसुली झाली. वसुलीचे प्रमाणे १००.८१ टक्के इतके आहे. त्या अनुषंगाने यंदा ८०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे विभागाचे १९५ कोटी, तर कोल्हापूर जिल्ह्याचे उद्दिष्ट ११ कोटी ७५ लाख इतके आहे. गतवर्षात राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या करमणूक शुल्क वसुलीच्या प्रमाणात तसेच करमणूक केंद्राच्या संख्येच्या अनुषंगाने वसुलीची क्षमता लक्षात घेऊन यावर्षीच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक ४४३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट कोकण विभागाचे, तर सर्वांत कमी २२ कोटी वसुलीचे उद्दिष्ट अमरावती विभागाचे आहे. व्हिडीओ गेम्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, विविध मनोरंजन व करमणूक कार्यक्रमांच्या परवानगीसाठी आकारले जाणारे शुल्क आणि दूरचित्र वाहिन्यांच्या केबल नेटवर्कसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा यामध्ये समावेश आहे.विभागनिहाय उद्दिष्टांमध्ये कोणताही बदल न करता आवश्यकतेनुसार जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्तीचा अहवाल दरमहा ५ तारखेपूर्वी विहित विवरणपत्रात शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यंदाचे विभागनिहाय उद्दिष्ट असे२०१५-१६ या आर्थिक वर्षातील विभागनिहाय करमणूक शुल्क उद्दिष्ट असे - कोकण विभाग - ४४३ कोटी, पुणे विभाग - १९५ कोटी, नाशिक विभाग - ५५ कोटी, अमरावती विभाग - २२ कोटी, नागपूर विभाग - ३५ कोटी, औरंगाबाद विभाग - ५० कोटी.कोल्हापूर ११.७५ कोटी, सिंधुदुर्ग १.७५ कोटीजिल्ह्याच्या उद्दिष्टानुसार यावर्षी कोल्हापूरला ११ कोटी ७५ लाख, सांगलीला ९ कोटी, साताऱ्याला ७ कोटी २५ लाख, रत्नागिरीला ४ कोेटी २५ लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ कोटी ८५ लाख रूपये करमणूक शुल्कापोटी वसूल करावे लागणार आहेत.