शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
4
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
5
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
6
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
7
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
8
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
9
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
10
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
11
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
12
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
13
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
14
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
15
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
16
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
17
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
18
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
19
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
20
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत आणखीन ८ लसीकरण केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

इचलकरंजी : शहर परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यासह सर्वांनी लस घेेणेही गरजेचे आहे. त्यासाठी ...

इचलकरंजी : शहर परिसरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यासह सर्वांनी लस घेेणेही गरजेचे आहे. त्यासाठी शहरात आणखीन ८ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. या सर्व केंद्रात शासनाकडून मोफत लस दिली जाणार असून ४५ वर्षावरील सर्वांनीच लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शहर परिसरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार आवाडे यांनी आयजीएम रुग्णालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.आर. शेट्ये, डॉ. महेश महाडिक, डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांच्याकडून रुग्णालयात सध्या उपचार घेणारे रुग्ण, त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा, औषधोपचार या संदर्भात माहिती जाणून घेतली.

त्यानंतर आमदार आवाडे यांनी रुग्णालयात उपचारा घेणाऱ्या ४५ कोरोनाबाधितांपैकी ज्यांना गृहअलगीकरण व्हायचे असेल त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहअलगीकरण व्हावे. पण या कालावधीत त्यांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेऊन घराबाहेर पडू नये. अन्यथा ही सुविधा बंद करून सर्वांनाच अलगीकरण केंद्रात रहावे लागेल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीची लस आयजीएम रुग्णालयासह ६ प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध आहे. या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून आणखीन ८ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, आयजीएमचे प्रमुख, नगराध्यक्षा आणि संबंधितांशी चर्चा झाली असून ४ एप्रिलपासून ही नवीन लसीकरण केंद्रे सुरू होतील. यावेळी संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, प्रकाश मोरे, विलास गाताडे, नगरसेवक राजू बोंद्रे आदी उपस्थित होते.