इचलकरंजीत ६७ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST2021-05-21T04:25:55+5:302021-05-21T04:25:55+5:30

इचलकरंजी : येथील विविध २८ ठिकाणी ६७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान जय सांगली नाका येथील ६२ ...

67 positive in Ichalkaranji; Death of three | इचलकरंजीत ६७ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

इचलकरंजीत ६७ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

इचलकरंजी : येथील विविध २८ ठिकाणी ६७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान जय सांगली नाका येथील ६२ वर्षीय वृद्ध, गणेशनगर येथील ३९ वर्षीय पुरुष व यशवंत कॉलनी येथील ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर ११, शहापूर ७, संत मळा, आसरानगर प्रत्येकी ६, सांगली नाका ४, गांधी कॅम्प, हत्ती चौक, बंडगर माळ प्रत्येकी ३, दातार मळा, पाटीलनगर, पुजारी मळा, गावभाग प्रत्येकी २, येलाज मळा, चांदणी चौक, कलानगर, दत्तनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, वर्धमान चौक, सुतार मळा, व्यंकटेश कॉलनी, केटकाळे गल्ली, संभाजी चौक, रसना कॉर्नर, विक्रमनगर, कारंडे मळा, कोले मळा, कोल्हापूर नाका येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार १८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार ४३० जण बरे झाले आहेत. ४६२ जण उपचार घेत असून, २९७ वर मृत्यूसंख्या पोहोचली आहे.

Web Title: 67 positive in Ichalkaranji; Death of three