शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नृसिंहवाडीच्या नृसिंह ग्रामीण पतसंस्थेत ६१ लाखांचा अपहार

By admin | Updated: February 26, 2015 00:22 IST

अध्यक्ष, उपाध्यक्षांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ६१ लाख ६१ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार लेखा परीक्षक शिवदास भिवसन सोनवणे (वय ४५, रा. सम्राट कॉलनी, कोल्हापूर) येथील शिरोळ पोलिसांत दिली आहे. अपहार प्रकरणामुळे नृसिंहवाडीसह तालुक्यात खळबळ उडाली आहे.संस्थेचे अध्यक्ष मोहन दत्तात्रय गवंडी, उपाध्यक्ष बाळासाहेब दादा अणुजे, संचालक प्रकाश दादू साळुंखे, मुकुंद सखाराम पुजारी, तानाजी दादू निकम, राजेंद्र भाऊसो अणुजे, वसंतराव सदाशिव मोरबाळे, दत्तात्रय गजानन रूक्के-पुजारी, सुभाष बाळू रूकडे, महिपती रामचंद्र भोसले, सुगंधा दत्तात्रय कदम, शालन वसंतराव धनवडे, सुकुमार आण्णा नंदगावे (मृत), दत्तात्रय परशराम धनवडे (मृत), चित्राबाई चुडाप्पा कांबळे (मृत), सचिव मधुकर श्रीनिवास कुलकर्णी, क्लार्क - संजय आण्णासाहेब खरोसे, आदगोंडा नेमगोंडा पाटील, वंदना प्रवीण सुतार, कॅशियर सदानंद शामराव पवार, कल्पना दिलीप चव्हाण (सर्व रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, श्री नृसिंह ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००८ या कालावधीत चाचणी लेखा परीक्षण करण्यात आले होते. या कालावधीत संचालक मंडळ, सचिव व कर्मचारी यांनी सहकारी संस्थेचा कायदा, त्या खालील नियम तसेच मंजूर पोटनियमातील तरतुदीप्रमाणे काम करणे आवश्यक होते. मात्र यामध्ये गैरव्यवहार व अपहार करून तो लपविण्याच्या उद्देशाने नियमबाह्य खर्च करून संचालक मंडळ व कर्मचारी यांनी स्वत:च्या नावावर मर्यादेपेक्षा जादा रकमेची कर्जे उचल केली आहेत. हिशोबामध्येही अनेक त्रुटी ठेवून चुकीचा जमाखर्च करणे, खोट्या नोंदीशिवाय चुकीचे आर्थिक पत्रके तयार करून सभासदांची दिशाभूल केली आहे.ठेवी नसताना हितसंबंधितांच्या नावावर ठेवतारण कर्ज दाखवून संगनमत करून संस्थेच्या निधीचा गैरवापर केला आहे. विशेष म्हणजे याबाबत कारवाई होऊ नये असा ठराव करून स्वत:च्या नावावर कर्जे, खर्च टाकून ६१ लाख ६१ हजार ९६ रूपये ६८ पैसे इतक्या रकमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लेखापरीक्षक सोनवणे यांच्या तक्रारीनुसार संस्थेच्या अध्यक्षासह २१ जणांविरुद्ध शिरोळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. दरम्यान, २१ पैकी ३ संचालक मृत आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार चळचुक करीत आहेत. (प्रतिनिधी)