शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

By संदीप आडनाईक | Updated: September 5, 2025 12:22 IST2025-09-05T12:21:58+5:302025-09-05T12:22:38+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य

54 year old teacher Jeevan Mithari took on the challenge of teaching just two female students at Kavaltek Dhangarwada located in the dense forest of Gaganbawada taluka kolhapur | शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

शिक्षक दिन विशेष: घनदाट जंगल, खडतर पायवाटेने चालत जात देताहेत दोनच मुलींना धडे; ५४ वर्षीय जीवन मिठारींनी आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

संदीप आडनाईक

कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील घनदाट जंगलात असलेल्या कावळटेक धनगरवाड्यावर अवघ्या दोन विद्यार्थिनींना शिकवण्याचे व्रत एक शिक्षक पार पाडत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अजूनही या छोट्याशा वाडीने विजेचा प्रकाश पाहिलेला नाही हे आणखीन एक आश्चर्य. उंचावर असल्याने वाहन पोहोचत नाही. खडतर निसरड्या पायवाटेने दोन-अडीच किलोमीटर चालत, कसरत करत गेली १२ वर्षे एक शिक्षक या शाळेतील केवळ दोनच विद्यार्थिनींना शिकवण्याचे काम अशा खडतर आणि दुर्गम जागेत करतो आहे.

गगनबावडा हा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेच्या टोकावर सह्याद्रीच्या धारेतून पुढे आलेला तालुका. कोल्हापूरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेला हा तालुका येथे पडणाऱ्या तुफान पावसामुळे ओळखला जातो. ‘याच तालुक्यात धुंदवडे गावाजवळ कावळटेक ही धनगरवाडी. या वाडीत पूर्वी ६० ते ७० कुटुंबे राहात होती. परंतु जागतिकीकरणात ग्रामस्थांनी गाव सोडले त्याला ३५ वर्षे झाली. रोजगारासाठी ही कुटुंबे कोल्हापूरला स्थलांतरित झाली. 

वाचा-  शिक्षक शिक्षकदिनीच वेतनाविना, कोल्हापूर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शिक्षकांमध्ये नाराजी

सध्या या वाडीत केवळ तीन कुटुंबे राहतात. त्यातील दोन कुटुंबे अजूनही कोल्हापूरला राेजगारासाठी येऊन जाऊन आहेत परंतु एक कुटुंब इथेच स्थायिक आहे. याच कुटुंबातील तीनपैकी इयत्ता चौथीत असलेली कल्याणी दगडू बोडके आणि इयत्ता दुसरीत असलेली तिचीच बहीण स्वरा दगडू बोडके या दोघीच या शाळेत शिकतात. आणखी एक-दोन वर्षांनी या शाळेत येईल. पन्हाळा तालुक्यातील कळे येथील ५४ वर्षांचे जीवन वसंतराव मिठारी हे एकमेव शिक्षक या शाळेत शिकवण्यासाठी रोज येतात.

वाचा - देवळात, समाजमंदिरात भरतात अंगणवाडी; कोल्हापूर जिल्ह्यात १४४३ जागी इमारती नाहीत, तालुकानिहाय स्थिती..जाणून घ्या

आव्हान म्हणून स्वीकारली जबाबदारी

मिठारी यांनी गेली १२ वर्षे त्यांनी हे तप स्वीकारले आहे. कारण इथे शिकवण्यासाठी कोणी तयार नव्हते, परंतु कोल्हापूर जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी हे आव्हान स्वीकारले, आणि सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे अजून चार वर्षे हा शिक्षणाचा वसा त्यांनी स्वीकारला आहे.

वन्यप्राण्यांची भीती

वनविभागाच्या जागेतून या वाडीत जाण्यासाठी खडतर रस्ता आहे. याठिकाणी कोणत्याही हंगामात वाहन जात नाही. वाटेत गवे, कोळशिंगे आणि पाळीव गाई अशा वन्यप्राण्यांचाही मोठा त्रास आहे. त्यामुळे सकाळी लवकर येणे आणि सायंकाळी लवकर निघणे असा दिनक्रम मिठारी सरांना पाळावा लागतो.

Web Title: 54 year old teacher Jeevan Mithari took on the challenge of teaching just two female students at Kavaltek Dhangarwada located in the dense forest of Gaganbawada taluka kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.