शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील जिल्हा बँकांचे ५३३९ ठराव संस्थांमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:26 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील तिन्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सभासद संख्या आणि प्रत्यक्ष दाखल ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील तिन्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची सभासद संख्या आणि प्रत्यक्ष दाखल झालेले ठराव यांमध्ये तब्बल ५३३९ संस्थांची तफावत आहे. सभासद संख्येच्या तुलनेत ३० टक्के संस्थांचे ठराव संस्थांमध्येच राहिले आहेत. सांगलीत एकूण सभासदांच्या ५६ टक्के ठराव दाखल झालेले नाहीत. अवसायकसह नोंदणी रद्द ही जरी कारणे असली तरी काही संस्थांमधील अंतर्गत वादातूनही ठराव दाखल होऊ शकलेले नाहीत.

महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा बँकेत सातारा व कोल्हापूर जिल्हा बँकांचा समावेश आहे. उलाढालीच्या पातळीवर पुणे जिल्हा बँक पुढे असली तरी कामकाजाच्या पातळीवर सातारा जिल्हा बँक ही मॉडेल आहे. सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्हा बँकांच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने त्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. तिन्ही बँकांनी आपल्या सभासद संस्थांची यादी सहकार विभागाकडे पाठविली होती. त्यानुसार सहकार विभागाने संबधित संस्थांना आपल्या प्रतिनिधींच्या नावाचे ठराव दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दोन टप्प्यांत ठराव मागवले, दुसऱ्या टप्याची मुदत सोमवारी (दि. २२) संपली. बँकेचे सभासद व दाखल ठरावांची संख्येत मोठी तफावत आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे चार गटांत ११ हजार ४४८ सभासद आहेत. मात्र प्रत्यक्षात ठराव ८५०० दाखल झाले आहेत. सांगली जिल्हा बँकेचे ४०८६ सभासद असताना २३१२ संस्थांनी, तर सातारा जिल्हा बँकेचे २६३० सभासद व ठराव २०१३ दाखल झाले आहेत. तिन्ही जिल्हा बँकांचे १८ हजार १६४ सभासदांपैकी १२ हजार ८२५ ठराव दाखल झाले आहेत. एकूण सभासद संख्येच्या ३० टक्के संस्थांचे ठरावच आलेले नाहीत.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘सहकार शुद्धीकरण’ मोहीम हातात घेतली होती. कागदावरील संस्था शोधून त्या अवसायनात काढण्याचा धडाका लावला होता. काहींची नोंदणीही रद्द केली आहे. त्यामुळे ठराव कमी दाखल झाले, हे जरी खरे असले तरी काही संस्थांमधील अंतर्गत वादातूनही ठराव वेळेत येऊ शकलेले नाहीत.

विकास संस्थांचे १०० टक्के ठराव

जिल्हा बँकेच्या सत्ताकरणात विकास संस्था गट महत्त्वाचा असतो. विकास संस्थांवर ज्यांची पकड त्यांच्याच हातात बँकेच्या चाव्या येतात. उर्वरित सर्व प्रकारच्या संस्थांमधून चार संचालक बँकेवर येतात. त्यामुळे सर्वच संचालकांचे लक्ष विकास संस्था गटावर असल्याने येथून १०० टक्के ठराव आले आहेत.

बँकनिहाय सभासद व दाखल ठराव असे -

जिल्हा बँक सभासद दाखल ठराव

कोल्हापूर ११४४८ ८५००

सांगली ४०८६ २३१२

सातारा २६३० २०१३

एकूण १८१६४ १२८२५