इचलकरंजीत ४५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:24+5:302021-06-02T04:20:24+5:30

इचलकरंजी : शहरात विविध २७ भागांतील ४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ...

45 positive in Ichalkaranji; Death of one | इचलकरंजीत ४५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजीत ४५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात विविध २७ भागांतील ४५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान गणेशनगर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जवाहरनगर, सांगली रोड वठारे मळा प्रत्येकी ५, स्वामी अपार्टमेंटजवळ ३, रिंग रोड, पुजारी मळा, जुना चंदूर रोड, नेहरूनगर, गावभाग, निरामय हॉस्पिटलजवळ, संजय फौंड्रीजवळ, कोल्हापूर नाका येथील प्रत्येकी २, महात्मा फुले पुतळ्याजवळ, शुक्रतारा रेसिडन्सी, आमराई मळा, बावणे गल्ली, मोठे तळे, ढवळे हॉस्पिटलजवळ, चांदणी चौक, विक्रमनगर, आसरानगर, शेळके मळा, गांधी कॅम्प, वैरण बाजार व मथुरानगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार ७८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पाच हजार ९६४ जण बरे झाले असून, ४७३ जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या ३४७ वर पोहोचली आहे.

Web Title: 45 positive in Ichalkaranji; Death of one