इचलकरंजीत ४२ जण पॉझिटिव्ह ; २ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST2021-05-17T04:24:41+5:302021-05-17T04:24:41+5:30

इचलकरंजी : शहरात रविवारी २८ ठिकाणी ४२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दोनजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केटकाळेनगर येथील ...

42 positive in Ichalkaranji; 2 deaths | इचलकरंजीत ४२ जण पॉझिटिव्ह ; २ मृत्यू

इचलकरंजीत ४२ जण पॉझिटिव्ह ; २ मृत्यू

इचलकरंजी : शहरात रविवारी २८ ठिकाणी ४२ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दोनजणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केटकाळेनगर येथील ५५ वर्षीय महिला व ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विकासनगर ४, जुना चंदूर रोड, गणेशनगर, जवाहरनगर येथील प्रत्येकी ३, यशवंत कॉलनी, सूर्योदयनगर, खंजिरे मळा, विक्रमनगर, डॉ. आंबेडकरनगरमधील प्रत्येकी २, मथुरानगर, मंगळवार पेठ, कृष्णानगर, रिंग रोड, भोनेमाळ, हत्ती चौक, दाते मळा, शेळके गल्ली, राणी बागेजवळ, वेताळ पेठ, पुजारी मळा, बरगे मळा, निशिगंधा हौसिंग सोसायटी, कागवाडे मळा, कापड मार्केट, कारंडे मळा, सरस्वती मार्केट, गावभाग, मधुबन हाऊसिंग सोसायटी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सहा हजार २ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार १५३ जण बरे झाले आहेत. सध्या ५६५ जण उपचार घेत असून, २८४ वर मृत्यूसंख्या वर पोहचली आहे.

Web Title: 42 positive in Ichalkaranji; 2 deaths