शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना थेट पुढच्या वर्गासाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महापालिका, खासगी शाळांमधील ४ लाख ६० हजार विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत.

गेल्यावर्षीही नेमके कोरोनाचा संसर्ग मार्चमध्ये सुरू झाला होता. त्यामुळे परीक्षांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यानंतर शाळाही बंद करण्यात आल्या. गेले वर्षभर ऑनलाईनच्या माध्यमातून अध्यापन करण्यासाठी शाळांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर अभ्यास आणि पाठ पाठवण्यात आले. त्याचा लाभही लाखो विद्यार्थ्यांनी घेतला. खासगी शाळांनी तर काटेकोरपणे ऑनलाईन वर्ग घेतले.

सप्टेंबर २०२० नंतर कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी येऊ लागले. यानंतर डिसेंबरपासून अनेक माध्यमिक शाळा सुरू झाल्या. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट अध्यापन सुरू झाले. परंतु आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अखेर पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील साडेचार लाखांवर विद्यार्थी पुढच्या वर्गात जाण्यास पात्र ठरले आहेत.

मात्र या निर्णयामुळे पालकांमध्ये नाराजी दिसून आली. वेगळ्या परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे, शिक्षकांनी अनेक मर्यादा असूनही अध्यापन केले आहे. तेव्हा परीक्षा झाली असती, तरी किमान मुलांची काय तयारी झाली आहे, हे तरी समजले असते, अशी पालकांची भूमिका आहे. मात्र सीबीएससी पॅटर्न आणि अन्य खासगी शाळांनी याआधीच ऑनलाईन परीक्षा घेतल्याचे सांगण्यात आले.

चौकट

पहिली ते आठवी विद्यार्थी २ लाख ४८ हजार ८६७

मुली २ लाख ११ हजार ६८५

एकूण ४ लाख ६० हजार ५५२

पहिली ते आठवीपर्यंतची २०२० च्या शैक्षणिक वर्षातील शाळा व विद्यार्थी संख्या

आजरा - १३५ : ८०३३

भुदरगड - १७२ : १०७७३

चंदगड-२१२ : १४४६६

गडहिंग्लज-१५४ : १४४७२

गगनबावडा-७१ : ३०७२

हातकणंगले-३४३ : ५९१८७

कागल-१५४ : २०२३६

करवीर-२३९ : ३६६७०

पन्हाळा-२२७ : २०८९३

राधानगरी-२१५ : १५३६३

शाहूवाडी-२७७ : १४७८८

शिरोळ-२०४ : २६०५६

नगरपालिका विद्यार्थी संख्या

गडहिंग्लज - ०६ : ८७०

इचलकरंजी-४७ : ७१६५

कागल-०६ : ८०२

जयसिंगपूर- १० : ६८६

कोल्हापूर महापालिका

शाळा : १८६ : ७६,७६०

चौकट

सलग दोन वर्षे परीक्षा नाहीत

गेल्यावर्षी दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपर होण्याआधी कोरोनाचा कहर सुरू झाला. अखेर दहावीचा हा पेपरच रद्द करण्यात आला. त्यामुळे नंतरच्या कोणत्याही परीक्षा झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या कामगिरीवर मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले आणि उत्तीर्ण करण्यात आले. यंदाही सलग दुसऱ्यावर्षी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोट

गेल्या वर्षभरात मुलांना ऑनलाईन शिकवण्यात आले. त्यानुसार मुलांनी अभ्यासही केला आहे. त्याचे मूल्यमापन होण्याची गरज आहे. ऑनलाईन का असेना परीक्षा घेण्याची गरज आहे.

दिलीप गायकवाड, पालक

कोट

गेल्यावर्षीही परीक्षा झालेल्या नाहीत. परीक्षा नाही म्हटले की मुले म्हणावा तसा अभ्यास करत नाहीत. मुलांचा अभ्यास सुरू आहे. ती पास होवोत किंवा नापास; पण परीक्षा होण्याची गरज आहे.

कोमल पाटील, पालक

ग्रामीण भागामध्ये अतिशय अडचणीच्या परिस्थितीत मुलांनी गेल्या वर्षभरात शिक्षण घेतले आहे. एक तर प्रत्यक्ष अध्ययन नसल्यामुळे केवळ ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवले गेले. त्यामुळे शिकण्यावरही मर्यादा आल्या. अशातच आता यंदाही परीक्षा होणार नसल्याने अप्रत्यक्षरित्या हे विद्यार्थ्यांचे नुकसानच आहे.

कविता लोंढे

शिक्षणतज्ज्ञ कोट

कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जरी निर्णय योग्य वाटत असला, तरीही काही ना काही मूल्यमापन होण्याची गरज होती. गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये जे काही अध्यापन झाले आहे त्याआधारे परीक्षा हाेणे आवश्यक होते. नाही तरी आठवीपर्यंत कुणालाच नापास करायचे नाही, असेच शासनाचे धोरण आहे.

संपत गायकवाड, निवृत्त सहा. शिक्षण संचालक

कोट

कितीही विपरित परिस्थिती असली, तरी परीक्षा दिल्याशिवाय आपण पुढच्या इयत्तेत जाऊ शकतो, असा चुकीचा संदेश या निर्णयामुळे जाऊ शकतो. जे काही जुजबी अध्यापन झाले आहे त्याआधारे का असेना काही ना काही परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्याची गरज होती.

भगवान पाटील,

जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद, कोल्हापूर