शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोघांकडून ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: September 2, 2015 23:38 IST

चंदगड पोलिसांची कारवाई : अठरा घरफोड्यांची कबुली

कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात घरफोड्यांचा धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना चंदगड पोलिसांनी अटक केली होती. प्रकाश विनायक पाटील (वय ३०, रा. झरीवाडा सतेरी-गोवा), अजित शिवराई धनगर (२५, रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी कोल्हापूर-बेळगाव सीमाभागातील घरफोडीच्या १८ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून एक किलो साडेसहा तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदी, दोन आलिशान कार, दोन मोटारसायकली, फर्निचरचे साहित्य असा सुमारे ३६ लाख ४३ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा सीमाभागात गेल्या वर्षभरापासून दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. अशा पद्धतीने घरफोडी करणाऱ्यांची माहिती घेताना चंदगड पोलिसांची दमछाक झाली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक अंगद जाधवर व पोलीस उपनिरीक्षक शरद माळी यांनी कर्नाटक, गोवा व कोल्हापूर जिल्ह्यांतील घरफोड्यांची सखोल माहिती घेतली असता बेळगावचा मूळ रहिवासी परंतु गोवा येथे वास्तव्यास असणारा प्रकाश पाटील व त्याचा साथीदार राजू चारी यांची नावे पुढे आली. दोघांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रकाश पाटीलला व त्याचा तिसरा साथीदार अजय धनगर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोड्यांची कबुली दिली. या चोरट्यांनी पोलिसांच्याही घरी डल्ला मारल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या दोघांचा तिसरा साथीदार राजू सलवराज चारी हा पसार आहे. रात्री नव्हे, दिवसा लक्ष गडहिंग्लज, चंदगड, नेसरी परिसरात घरे लांब-लांब आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्याने घरातील सर्वच लोक दिवसा शेतामध्ये घराला कुलूप लावून जात असतात. त्यामुळे संशयित दिवसा कोणते घर बंद आहे, याचा अंदाज घेत असत. त्यानंतर त्या घराच्या पाठीमागील दरवाजाची बिजागरी तोडून आतमध्ये प्रवेश करीत असत. आलिशान राहणीमान प्रकाश पाटील व राजू चारी हे दोघे गोव्यामध्ये आलिशान फ्लॅटमध्ये कुटुंबासह राहतात. दिमतीला मोटारी व रुबाबदार राहणीमान असल्याने ते चोर असल्याची शंका कुणालाच येत नव्हती. चोरीच्या पैशातून त्यांनी मोटारी, दुचाकी, सोफासेट, खुर्च्या खरेदी केल्या होत्या. या सर्व साहित्यासह सोन्या-चांदीचे दागिने, विदेशी चलनाच्या नोटा, पासपोर्ट, धनादेश, हे सर्व हस्तगत केले.