दीड महिन्यामध्ये कोल्हापूर सीपीआरमध्ये २८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:24 AM2020-04-29T10:24:46+5:302020-04-29T10:25:03+5:30

याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

 28 killed in Kolhapur CPR in a month and a half | दीड महिन्यामध्ये कोल्हापूर सीपीआरमध्ये २८ जणांचा मृत्यू

दीड महिन्यामध्ये कोल्हापूर सीपीआरमध्ये २८ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.

कोल्हापूर : सीपीआरमध्ये कोरोना संशयित रुग्णांची तपासणी सुरू झाल्यापासून कोरोना व्यतिरिक्त २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. न्यूमोनिया, हृदयविकार, श्वसनाचा त्रास, अर्धांगवायू, निकामी झालेले फुप्फुस आदी कारणांनी हे मृत्यू झाले आहेत. दक्षता म्हणून यातील २७ जणांच्या घशातील स्राव घेण्यात आले होते. मात्र, ते देखील निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात आले.

सीपीआरमध्ये ११ मार्चपासून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी आणि त्यांच्या घशातील स्राव घेण्याचे काम सुरू करण्यात आले. काही कालावधीनंतरकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडू लागले आणि सीपीआर हे कोरोना विशेष उपचार रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

याउलट अनेक खासगी रुग्णालयांनी गंभीर झालेले रुग्ण कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे पाठवायला सुरुवात केली. हृदयविकारापासून अर्धांगवायू झालेले रुग्णही कोरोना संशयित म्हणून सीपीआरकडे रात्री अपरात्री पाठविले जाऊ लागले. तसेच याच दरम्यान काही खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी पैशाचीही मागणी केली. परिणामी, असे रुग्ण सीपीआरकडे येऊ लागले.

त्यामुळे पालकमंत्री पाटील यांना हा निर्णय बदलून पुन्हा सीपीआरमध्ये रुग्णांची सोय करणे भाग पडले. त्यामुळे अगदी परवापर्यंत अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना सीपीआरकडे पाठवून देण्याची पद्धत पडली आहे. कोणत्याही प्रकारचा रुग्ण समोर आल्यानंतर शासकीय दवाखाना रुग्णाला नाकारू शकत नसल्याने सीपीआरच्या वैद्यकीय पथकांनीही आता प्रसूती, बालरोग विभाग, डायलेसिस, विषबाधा विभाग, हृदयविकार विभाग सुरू करून आपले काम सुरू ठेवले आहे. परंतु असे अनेक गंभीर रुग्ण सीपीआरमध्ये आणले गेल्याने येथील मृत्यू पावलेल्यांची संख्या गेल्या दीड महिन्यात २८ इतकी झाली आहे.

रुग्ण आणि नातेवाईकांना मनस्ताप
खेडेगावातून आलेल्या अनेक रुग्णांची सीपीआरमधील अन्य विभाग बंद केल्यानंतर गैरसोय झालीच. परंतु त्यांना मनस्तापही सहन करावा लागला. हे सर्वजण पहिल्यांदा सीपीआरमध्ये येत असत. तेथे अन्य विभाग बंद केल्यानंतर मग त्यांना लाईन बाजार येथील सेवा रुग्णालयाकडे जाण्यास सांगितले जाई. तेथे गेल्यानंतर तेथून संदर्भ चिठ्ठी घेऊन खासगी रुग्णालयाला पाठविले जाई. परंतु काही ठिकाणी दाखल करून घेताना विलंब होत असल्याने अनेकजण पुन्हा सीपीआरकडे येत होते.

Web Title:  28 killed in Kolhapur CPR in a month and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.