नवे २५ कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:27 IST2021-03-09T04:27:11+5:302021-03-09T04:27:11+5:30

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे २५ रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ...

25 new corona patients, both die | नवे २५ कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

नवे २५ कोरोना रुग्ण, दोघांचा मृत्यू

कोल्हापूर : गेल्या २४ तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे २५ रुग्ण आढळले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक म्हणजे १६ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.

हातकणंगले तालुक्यात एक, करवीर तालुक्यात तीन, नगरपालिका क्षेत्रात दोन आणि इतर जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेले तिघे कोरोनाबाधित झाले आहेत. दिवसभरात ३३१ जणांची तपासणी करण्यात आली असून, ९१९ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. १४० जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली असून, ३३८ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

कोरोनाग्रस्त असलेल्या शाहुुपुरीतील ७२ वर्षीय महिलेचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला असून, न्यू पॅलेसजवळील ७० वर्षीय पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दिवसभरामध्ये ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Web Title: 25 new corona patients, both die