महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून २४०० सिंरिंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:17 IST2021-06-11T04:17:33+5:302021-06-11T04:17:33+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून २४०० सिंरिंज देण्यात आली. हे साहित्य प्रशासक डॉ. कादंबरी ...

2400 syringes from retired employees of NMC | महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून २४०० सिंरिंज

महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून २४०० सिंरिंज

कोल्हापूर : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसाठी महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून २४०० सिंरिंज देण्यात आली. हे साहित्य प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे देण्यात आले.

महापालिकेने वस्तू स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्याकडून सदरचे साहित्य देण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, मोहन सातारकर, दीपक कागलकर, रमेश पंडत, दिलीप पंडित, बाबूराव पंडत उपस्थित होते.

भूपाल शेटे यांच्याकडून औषधे

महापालिकेमार्फत चालविल्या कोविड केअर सेंटरसाठी माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्याकडून ॲलोपॅथिक औषधे देण्यात आली. औषधे आयुक्त कार्यालयात बलकवडे यांच्याकडे देण्यात आली. मदत करण्याच्या आवाहनास प्रतिसाद देऊन भूपाल शेटे यांनी औषधे दिली. यावेळी प्रसाद शेटे, केशव सातपुते उपस्थित होते.

Web Title: 2400 syringes from retired employees of NMC