शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

अबब... कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत प्रभाग रचनेबद्दल २४ हजार हरकती

By समीर देशपांडे | Updated: October 29, 2025 16:29 IST

अंतिम रचना शुक्रवारी जाहीर : कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष

समीर देशपांडे

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका आणि नगरपंचायतींची प्रभाग रचना ३१ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. दरम्यान या रचनेवर जिल्ह्यातून तब्बल २३ हजार ८२० हरकती घेण्यात आल्याने याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेणार, याकडे कार्यकर्त्यांसह नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आधी या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले होते. त्यानुसार पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नंतर नगरपालिका आणि त्यानंतर महापालिका निवडणुका घेण्याचे सुतोवाच नेत्यांकडून होत होते.

दरम्यान मराठवाडा, विदर्भामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर राजकीय संदर्भ बदलले आहेत. अजूनही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाई जमा झालेली नाही. पुन्हा पाऊस सुरू झाल्यने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकांसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आता कार्यकर्त्यांचे लक्ष नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांकडे लागले आहे. यासाठी १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तोपर्यंत वरीलप्रमाणे हजारो हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. ७ नोव्हेंबरला मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आता ३१ तारखेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या आहेत हरकती

  • विचित्र पद्धतीने प्रभाग फोडण्यात आले आहेत.
  • नागरिक वार्ड ६ मध्ये राहायला आहे आणि त्याचे मतदान वार्ड क्रमांक ७ मध्ये दाखवण्यात आले आहे.
  • संलग्न भाग वगळला आहे.
  • यामुळे आरक्षणातही बदल झाला आहे.


नगरपालिका, पंचायती आलेल्या हरकती

  • जयसिंगपूर नगरपालिका : ९८८२
  • शिरोळ नगरपालिका : २४९८
  • आजरा नगरपंचायत : २२१२
  • वडगाव नगरपालिका : १७८३
  • कुरूंदवाड नगरपालिका : १६४३
  • गडहिंग्लज नगरपालिका : १४४८
  • चंदगड नगर पंचायत : १३४४
  • हातकणंगले नगर पंचायत : ९८३
  • हुपरी नगरपालिका : ९२६
  • कागल नगरपालिका : ६७८
  • पन्हाळा नगरपालिका : २१४
  • मलकापूर नगरपालिका : १२४
  • मुरगुड नगरपालिका : ८५
  • एकूण २३,८२०

नगरपंचायतीचे प्रभाग चुकीच्या पद्धतीने फोडले आहेत. त्यामुळेच आजऱ्यासारख्या छोट्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातूनही २२०० हून अधिक हरकती घेण्यात आल्या आहेत. - रशिद पठाण, आजरा

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipality Elections: 24,000 Objections Filed on Ward Structure

Web Summary : Kolhapur faces scrutiny as 23,820 objections flood ward formations for upcoming municipal elections. Focus shifts to administration's decision amid changed election schedules. Odd ward divisions, voter mismatches fuel concerns.