शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

ST Buses: कोल्हापूर-पुणे मार्गावर आजपासून दिवाळीनिमित्त २३५ जादा बसेस; खासगी बसेसकडून लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:24 IST

एसटी महामंडळाचे सर्वच प्रमुख मार्गांवर नियोजन

कोल्हापूर : महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आज, बुधवारपासून दिवाळीनिमित्त जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. पुणे - कोल्हापूर मार्गावर नियमित बसेसशिवाय तब्बल २३५ जादा बसेस धावणार आहेत. प्रवाशांची संख्या प्रचंड असल्याने त्यांची सोय आणि उत्पन्नही मिळवण्यासाठी महामंडळाने ५ नोव्हेंबरपर्यंत जादा बसेसचे नियोजन केले आहे.वर्षातील महत्त्वाचा सण असल्याने दिवाळीसाठी चाकरमानी गावाकडे सहकुटुंब येतात. शाळांनाही सुटी पडलेली असते. यामुळे बसेसना प्रचंड गर्दी असते. यामुळे पुणे - कोल्हापूर, मुंबई, परेल, बोरीवली, बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, निगडी, वल्लभनगर, रत्नागिरी, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, लातूर, बेळगाव यासह ग्रामीण भागातही जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे.दिवाळीसाठी गावी येण्यासाठी आणि परत जाण्यासाठीही जादा बसेस मार्गस्थ राहणार आहेत. जादा वाहतुकीच्या सर्व फेऱ्या ऑनलाइन आरक्षणासाठी उपलब्ध आहेत. प्रवाशांनी महामंडळाच्या बसस्थानकावरील आरक्षण केंद्र, वेब पोर्टल, मोबाइल ॲप सुविधेद्वारे आपली तिकिटे आगाऊ आरक्षित करावे, असे आवाहन महामंडळाच्या प्रशासनाने केले आहे.

आवडेल तेथे प्रवासदिवाळीच्या कालावधीत महामंडळाने चार, सात दिवस आवडेल तेथे प्रवास योजनेचाही प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. यासाठी सवलतीच्या दरात पासही देण्यात येणार आहे.

खासगी बसेसकडून लूटकोल्हापूरहून पुणे, मुंबईसह सर्वच प्रमुख शहरात अनेक खासगी बसेस धावतात. त्यांनीही दिवाळीनिमित्त दर वाढवले आहेत. जादा पैसे देईल, त्याला बुकींग दिले जात आहे. यावर कोटेकोरपणे नियंत्रण नसल्याने प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत.

पुन्हा बसस्थानक परिसरात बुलाव डाववाहतूक कोंडी आणि बुलाव डाव बंद होण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खासगी बसेस लावण्यास मज्जाव आहे. तरीही अनेक खासगी बसेस प्रवासी चढ, उतार करण्याच्या नावाखाली बसेस लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सायंकाळी सातनंतर खासगी बसवाले मध्यवर्ती बसस्थानकात येऊन प्रवाशांना बोलावून घेऊन जाताना दिसतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur-Pune Route: Diwali brings 235 extra buses, private loot.

Web Summary : Diwali rush sees 235 extra Kolhapur-Pune buses. Private operators exploit travelers with high fares. Bus stand faces congestion due to private buses.
टॅग्स :state transportएसटीkolhapurकोल्हापूरpassengerप्रवासीPuneपुणेDiwaliदिवाळी २०२५