शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

बहिरेवाडीत २२ शेळ्यांचा मृत्यू

By admin | Updated: November 15, 2014 00:14 IST

दोन लाखांचे नुकसान : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

वारणानगर : बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील भगवान सखाराम सातपुते यांच्या शेळीपालन कळपातील २२ शेळ्यांचा शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे दोन लाखांवर नुकसान झाले असून, शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शेळ्यांच्या आजारपणाबाबत कोणतेही प्रयत्न होत नसल्याने इतर शेळ्यांच्या बाबतीत सातपुते कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत.बहिरेवाडी येथे भगवान सातपुते गेल्या सात वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय करतात. १० आॅक्टोबरला या कळपातील एका शेळीचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही आणखी एका शेळीचा मृत्यू झाला. म्हणून मृत शेळीस कोल्हापूरच्या मंगळवार पेठेतील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यात आले. शेळीचे सॅम्पल तपासणीसाठी डॉक्टरांनी घेतले; परंतु सातपुते यांना सॅम्पल घेतलेच नाही. त्यामुळे रिपोर्ट देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. आजाराचे कोणतेही कारण न समजल्याने शेळ्यांचा आजारही वाढत गेला. दरम्यानच्या काळात आणखी ११ शेळ्यांचा मृत्यू झाला.सातपुते यांनी ३० आॅक्टोबरला कोल्हापूरच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात फोन केला असता तेथील कर्मचाऱ्यांनी सातपुते यांना उडवाउडवीची उत्तरे देत तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीस दाखवून शवविच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. अखेर सातपुते यांना कोणताही रिपोर्ट दवाखान्याकडून मिळाला नाही. शेवटी महिन्यांत २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. सातपुते यांना शेवटच्या क्षणापर्यंत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तर दिले. आजपर्यंत सातपुते यांच्या कुटुंबीयांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या उरलेल्या शेळ्या बचावतील का? या चिंतेत हे कुटुंबीय आहे. दरम्यान, आज, शुक्रवारी सातपुते यांनी संबंधित शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराबाबत जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी चौकशी करून न्याय देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)४तळसंदे (ता. हातकणंगले) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत शेळीचे विच्छेदन करून घ्या, असे सांगण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सॅम्पल काढून घेऊन कोल्हापूरच्या प्रयोगशाळेत पाठविले. याबाबत वारंवार पाठपुरावा करुनही सातपुते यांना अद्याप कोणताही अहवाल पशुवैद्यकीय दवाखान्याकडून मिळालेला नाही.