शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणात २१.२२ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : चांदोली धरणात सध्या २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे गतवर्षीइतकाच पाणीसाठा याहीवर्षी धरणात शिल्लक आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारूण : चांदोली धरणात सध्या २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. म्हणजे गतवर्षीइतकाच पाणीसाठा याहीवर्षी धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पुढील हंगामात पावसाचे उशिरा आगमन झाले तरी पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सध्यातरी चित्र आहे.

चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. दरवर्षी धरण शंभर टक्के भरते. याहीवर्षी धरण शंभर टक्के भरले होते. सध्या धरणात २१.२२ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणाची पाणीपातळी ६११.८५ मीटर इतकी आहे. धरणातून हिवाळ्यामध्ये दर २१ दिवसांनी, तर उन्हाळ्यामध्ये दर १५ दिवसांनी कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्यामुळे चांदोलीचा परिसर सतत सुजलाम्‌ सुफलाम्‌ असतो.

सध्या १,९८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे.

धरणातील सद्य:स्थितीचा असलेल्या पाणीपातळीचा विचार करता ऑक्टोबर ते मार्चअखेर सहा महिन्यांत १३.१८ टीएमसी पाणीसाठा संपला आहे. यावरून प्रत्येक महिन्याला साधारण २.१९ टीएमसी पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे महिन्याला तीन टीएमसी पाणी सोडले तरी ६ टीएमसी पाणी संपेल. मेअखेरपर्यंत धरणात १५ टीएमसी पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने या पाण्याचा अंदाज घेऊन पाण्याची टंचाई भासणार नाही व धरण तळही गाठणार नाही, असे नियोजन करणे गरजेचे आहे.

फोटो:

चांदोली धरण (छाया : सतीश नांगरे)