शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Kolhapur Crime: जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी २० हजाराची लाच, तलाठ्यासह एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 11:40 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : जमीनीचे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्यातील साजणी -तिळवणी येथील तलाठ्यासह एकास ...

दत्ता बिडकरहातकणंगले : जमीनीचे फेरफार नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच स्वीकारताना हातकणंगले तालुक्यातील साजणी -तिळवणी येथील तलाठ्यासह एकास रंगेहाथ पकडले. तलाठी सर्जेराव शामराव घोसरवाडे (वय-४१, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, पुईखडी, नवीन वाशी नाका, कोल्हापूर, मूळ गाव कांडगांव ता. करवीर) आणि एंजट साहिल यासीन फरास (२३, रा. साजणी, ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर) अशी दोघांची नावे आहेत. लाचलुचपत विभागाच्या पथकाने काल, बुधवारी ही कारवाई केली. तक्रारदार, यांनी साजणी गावामध्ये गट नं. १८८ मधील २१ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. त्यांचा फेरफार दप्तरी नोंद करणे कामी तसेच तक्रारदार यांचे वडीलांच्या नांवे तिळवणी येथील गट नंबर १८५ वर बँक बोंजा ७ x १२ पत्रकी नोंद करण्यासाठी तलाठी सर्जेराव घोसरवाडे यांच्याकडे सर्व कागदपत्रे सादर केली होती. याकामासाठी तलाठ्याने २० हजार रुपयाची मागणी केली होती. तक्रारदारने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपतने पडताळणी करुन काल, बुधवारी सापळा रचला. एंजट साईल फरास यांने २० हजाराची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ विकास माने, सुनिल घोसाळकर, रुपेश माने, उदय पाटील, सूरज अपराध यांच्या पथकाने केली.

खाबूगिरी उघडतलाठी यांची खाबूगीरी आजच्या कारवाईने उघड झाली आहे. गाव सज्जाच्या ठिकाणी खासगी उमेदवार नेमणूक करुन गावपातळीवर शासकीय योजनाच्या सर्व कागदपत्रावर सहया करण्यासाठी तलाठी दरोजच चिरीमिरी गोळा करत असतात. या कारवाईने महसूल विभागाचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले असून यापुढे सर्वसामान्याची लूट थांबणार का, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण