शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
2
नगरपरिषद निवडणुकांसाठी DCM एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनतेचा प्रचंड प्रतिसाद!
3
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
4
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
5
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
6
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
7
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
8
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
9
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
10
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
11
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
12
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
13
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
14
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
15
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
16
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
17
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
18
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
19
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
20
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात मतदार वाढले, कोणत्या तालुक्यात किती मतदार.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 17:24 IST

वाढलेल्या मतदारांत महिला अधिक

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत जिल्ह्यात १८ हजार २०६ नवीन मतदारांची नोंद झाली आहे. एका मतदान केंद्रावर १३५० मतदार या निकषानुसार ९१ नवीन मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघात प्रत्येकी दोन हजारांवर मतदार वाढले आहेत. ही मते फारच महत्त्वाची मानली जातात.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंगळवारी प्रारूप मतदार यादीची माहिती दिली. ते म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार पुनरिक्षण उपक्रम राबविण्यात येत असून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे. नागरिकांनी त्यात आपले नाव व संबंधित माहिती योग्य आहे का, याची तपासणी करावी. मतदार यादीवर २० तारखेपर्यंत दावे हरकती स्वीकारल्या जातील. त्या २९ तारखेपर्यंत निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदारयादी ३० तारखेला प्रसिद्ध होणार आहे. या कालावधीत १० व ११ तसेच १७ व १८ तारखेला विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम होणार असून बीएलओंमार्फत मतदान केंद्रांवर नोंदणी केली जाईल. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.

वाढलेल्या मतदारांत महिला अधिकगेल्या तीन महिन्यात वाढलेल्या मतदारांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत १ हजार ६७८ ने जास्त आहे. तृतीयपंथी मतदारांमध्ये फक्त ४ ने वाढ झाली आहे.

१ हजार १७४ नावे वगळलीलोकसभेनंतर मृत्यू, दुबार नोंदणी, स्थलांतर अशा विविध कारणांनी १ हजार १७४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये ६३७ पुरुष व ५३७ महिलांचा समावेश आहे.

मतदान केंद्रांची माहिती अशीमूळ मतदान केंद्रे : ३ हजार ३५९केंद्राच्या ठिकाणात बदल : १०१मतदान केंद्राच्या नावात बदल : २९नवीन मतदान केंद्र संख्या : ९१मतदारांचे विलीनीकरण केलेल्या केंद्रांची संख्या : १७८एकूण मतदान केंद्रे : ३ हजार४५०

वाढलेले मतदार असेमतदारसंघ : पुरुष : स्त्री : एकूणहातकणंगले : १ हजार १२८ : १ हजार ५९६ : २ हजार ७२५कोल्हापूर दक्षिण : १ हजार २६२ : १ हजार ४५३ : २ हजार ७१५शिरोळ : १ हजार ००३ : १ हजार ४१९ : २ हजार ४२२राधानगरी : ८५१ : ९२५ : १ हजार ७७६इचलकरंजी : ७७४ : ९११ : १ हजार ६८५कोल्हापूर उत्तर : ७८८ : ८९१ : १ हजार ६८०करवीर : ७४१ : ८७८ : १ हजार ६१९शाहूवाडी : ७०१ : ७०२ : १ हजार ४०४कागल : ५२८ : ५८४ : १ हजार ११२चंदगड : ४८६ : ५८१ : १ हजार ०६८एकूण : ८ हजार २६२ : ९ हजार ९४० : १८ हजार २०६

एकूण मतदार संख्यामतदार संघ  : पुरुष  : स्त्री  : तृतीयपंथी  : एकूणचंदगड : १ लाख ६० हजार ०८४  : १ लाख ५८ हजार ४९९  : ८  : ३ लाख १८ हजार ५९१राधानगरी : १ लाख ७३ हजार ८०९  :  १ लाख ६१ हजार ८४२  :  १४  :  ३ लाख ३५ हजार ६६५कागल : १ लाख ६६ हजार १८७  :  १ लाख ६४ हजार ३८३  :  ४  :  ३ लाख ३० हजार ५७४कोल्हापूर दक्षिण : १ लाख ७९ हजार २८५ : १लाख ७३ हजार १८६ :  ४७  : ३ लाख ५२ हजार ५१८करवीर : १ लाख ६३ हजार २९४  :  १ लाख ५० हजार ७०७  :  ०  :  ३ लाख १४ हजार ६३१कोल्हापूर उत्तर :  १ लाख ४६ हजार ११६  :  १ लाख ४८ हजार २९३  :  १८  :  २ लाख ९४ हजार ४२७शाहूवाडी :  १ लाख ५३ हजार ४९३  :  १ लाख ४३ हजार ३३२  :  ६  :  २ लाख ९६ हजार ८३१हातकणंगले : १ लाख ७० हजार ६२९  :  १ लाख ६३ हजार ५४१  :  १९  :  ३ लाख ३४ हजार १८९इचलकरंजी : १ लाख ५४ हजार ७४७  :  २ लाख ४७ हजार ५८१  :  ६०  :  ३ लाख २हजार ३८८शिरोळ : १ लाख ५९ हजार ८०८  :  १ लाख ६० हजार ०४०  :  ३  : ३ लाख १९ हजार ८५१एकूण : १६ लाख २८ हजार ०८२  :  १५ लाख ७१ हजार ४०४  :  १७९  :  ३१ लाख ९९ हजार ६६५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024