कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 18:26 IST2025-07-15T18:24:19+5:302025-07-15T18:26:18+5:30
अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्यचे विधानसभेचे करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे यांचाही समावेश

कोल्हापुरात काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का; माजी नगरसेवकांसह १६ जणांनी केला भाजपमध्ये प्रवेश
कोल्हापूर : येथील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांच्यासह अनेकांनी मंगळवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये बोंद्रे घराण्यातील अभिषेक बोंद्रे आणि जनसुराज्यचे विधानसभेचे करवीर मतदारसंघातील उमेदवार संताजी घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांचाही समावेश आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे भाजपचा मफलर गळयात घालून स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील एकूण १६ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार, शिवाजी पेठेतील प्रमुख कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, विधानसभा निवडणूक लढवलेले संताजी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला.
यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनात्मक बांधणी आणि खर्या कार्यकर्त्याला न्याय देणार्या भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होवू देणार नाही असे यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या कार्यक्रमात रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे, वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजीत माने, दिपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रूद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.