शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील १४१ कंपन्यांचे सीएसआर फंडाचे ३२ कोटी रुपये मिळण्याची संधी, क्षेत्रनिहाय जमा झालेला निधी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:53 IST

नियम आणि अटींची पूर्ती करणाऱ्या सामाजिक संस्थांना निधी दिला जाणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) फंडाच्या माध्यमातून २०२४-२५ या वर्षासाठी ३२ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम उपलब्ध झाली आहे. त्यातून विविध क्षेत्रासाठी हा निधी नियम आणि अटींची पूर्ती करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला जाणार आहे.हा निधी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ग्रामीण विकास, कला-संस्कृती, खेळांना प्रोत्साहन आणि झोपडपट्टी विकास अशा आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये खर्च केला जाणार आहे. जिल्ह्यातील १४१ कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर निधीतून ही रक्कम दिली आहे. हा निधी कोणत्या क्षेत्रासाठी खर्च करावा, त्यासाठी प्रत्येक कंपनीने क्षेत्र निवडले आहे. इच्छुक संस्थांनी या निधी आणि प्रक्रियेची माहिती दिल्ली येथील नॅशनल सीएसआर डेव्हलपमेंट पोर्टल किंवा नॅशनल सीएसआर एक्सेंज पोर्टलवर मिळू शकते.

क्षेत्रनिहाय जमा झालेला निधी

  • शिक्षण, अपंगत्व, उपजीविका : १८ कोटी ६३ लाख
  • आरोग्य, उपासमार, कुपोषण, स्वच्छता व सुरक्षित पाणी : ८ कोटी १६ लाख
  • पर्यावरण संवर्धन, प्राणी कल्याण : २ कोटी १२ लाख
  • खेळांना प्रोत्साहन : १ कोटी ४ लाख
  • महिला सक्षमीकरण, लिंग समानता : १ कोटी २ लाख
  • वारसा कला, संस्कृती : ५३ लाख
  • ग्रामीण विकास : ८४ लाख
  • झोपडपट्टी विकास : १ लाख

या निधीसाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा. त्यातून त्या सीएसआर फंडाशी जोडल्या जाऊन खऱ्या अर्थाने समाजहित साधतील. ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी निधी पोहोचला जाईल. - युवराज येडुरे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एनजीओ समिती 

जिल्ह्यातील ट्रस्टला सीएसआर फंडातून निधी कसा मिळतो, याची माहिती हवी. त्यासाठी काही संस्था मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. त्यांनी नाममात्र शुल्क घेऊन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना माहिती द्यावी किंवा जिल्हा प्रशासनाने त्याबाबतची जनजागृती करावी. - नितीन पाटील, संचालक, शिलेदार हायकर्स फाउंडेशन