शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बालकल्याण संकुलमधील १४ मुली कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : बालकल्याण संकुलमधील १४ मुली रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने महापालिकेच्या मदतीने शिवाजी विद्यापीठातील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.

कोल्हापुरातील बालकल्याण संकुलमध्ये समाजातील अनाथांचे संगोपन केले जाते. कोरोनाचा कहर सुरू होऊन एक वर्ष झाले तरी आजपर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता, पण रविवारी वर्षभराच्या काळजीवर पाणी फिरवत येथे कोरोनाने शिरकाव करत ६ ते १७ वयोगटातील तब्बल १४ जणींना बाधित केले. यामुळे बालकल्याण संकुल प्रशासन हादरले असून तातडीने उपचार व तपासण्या सुरू केल्या आहेत.

पाण्याच्या खजिन्याजवळील या संकुलमध्ये एका मुलीला तापाची लक्षणे जाणवत होती म्हणून अँटिजन तपासणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. लगेच तिच्या संपर्कातील अन्य मुलींची तपासणी केली गेली यात आणखी १३ जणी पॉझिटिव्ह आढळून आल्या. तातडीने त्यांना कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले. संपूर्ण संकुलात औषध फवारणी करण्यात आली. आणखी कोणाला लागण झाली असल्यास कळावी म्हणून आज, सोमवारी महापालिकेतर्फे मुलांची अँटिजन चाचणी केली जाणार आहे.

चौकट

बालकल्याण संकुलमध्ये ५ युनिटमध्ये २५० मुले-मुली राहतात. त्यात ४६ मुली आहेत.

चौकट

कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्यांमध्ये ६ वर्षाची एक, ८ वर्षाची एक, ९ आणि १० वर्षाच्या ३ आणि उर्वरित १७ ते १८ वयोगटातील आहेत.

चौकट

कोरोना झालेल्या या मुलींमध्ये सध्या कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाहीत.

चौकट

असा झाला शिरकाव

बालकल्याण संकुलमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत आणलेल्या मुलींनाही ठेवले जाते. त्यांना कोणतीही वेगळी वर्तणूक देता येत नाही. गेल्या आठवड्यात अशा १० ते १२ मुली आल्या होत्या. त्यांची कोणतीही टेस्ट न करताच त्यांना येथे आणले गेले. पॉझिटिव्ह आढळलेल्या १४ जणींमध्ये तब्बल ६ ते ७ जणी अशा बाहेरून आलेल्या आहेत. त्यांच्यामुळेच लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकट

गेले वर्षभर खूप काळजी घेतली जात आहे. या मुलांच्या संपर्कात कोणी येऊ नये म्हणून बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अंघोळ करून कपडे बदलून मगच आत यावे, असा नियम होता. त्याचे काटेकोर पालन आजही केले जाते.

चौकट

आम्ही खूप काळजी घेतली, पण पोक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या मुलींमुळे येथील लहानग्या मुलांना त्रास सहन करावा लागला आहे. बाहेरून येणाऱ्या मुलींसाठी विलगीकरण कक्षाची गरज आहे.

पद्मा तिवले, अधीक्षक, बालकल्याण संकुल.