शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

गुळाच्या थकबाकीपोटी उचलले पेट्रोल पंपावरील ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे साडे चार वर्षांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कारभारी मंडळीमुळेच संघ आतबट्यात आला. गेल्या पाच वर्षांत संघाचा गाडा रुळावर येईल, असे वाटत असतानाच अनेक प्रकारामुळे संघाच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. निवडणुकीनंतर एका संचालकाने संघाच्या गूळ अडत दुकानात गूळ लावण्यापोटी अकरा लाखांच्या ॲडव्हांसची उचल केली. गेली साडेचार वर्षे त्यातील एक दमडीही भरली नाही. संघाच्या पोटनियमानुसार जर घेतलेल्या ॲडव्हांसची हंगामात परतफेड झाली नाही तर त्यावर व्याज आकारणी करायची असते. त्यानुसार अकरा लाख मुद्दल व ४ लाख ५० हजार व्याज झाले. हा मुद्दा गेली दोन वर्षे संघाच्या संचालक मंडळात गाजत आहे. शासकीय लेखा परीक्षकांनी या थकबाकीवर आक्षेप घेत भरण्याचे आदेश दिले, तरीही संबधित संचालकाने पैसे भरले नाहीत. लेखा परीक्षकांच्या कारवाईतून वाचण्यासाठी ‘त्र्यंबोली’, ‘बिद्री’, ‘नेसरी’ व ‘कार्वे’ या पेट्रोल पंपांवर संबंधित संचालकाच्या नावे डिझेल व पेट्रोल विक्री उधारीवर दाखवून तेथील अकरा लाखांची उचल केली. ते गुळाच्या थकबाकीला भरले. यावर एका युवा संचालकाने जोरदार हरकत घेत भांडाफोड करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित संचालकाने सहा लाख रुपये जमा केले. मात्र, उर्वरित पाच लाख व व्याज भरणार नाही, यावर ते ठाम आहेत.

पाच लाखांचा ‘धनी’ कोण?

संचालकाने ११ लाख आपल्या नावावर उचल केली आणि त्यातील दुसऱ्या संचालकाला पाच लाख दिले. ते संचालक सध्या अपात्र असल्याने त्यांनी हात वर केल्याचे समजते. त्यामुळे पाच लाखांचा ‘धनी’ कोण? देणारा, घेणारा की द्यायला लावणारा, याविषयी संघात जोरदार चर्चा सुरू आहे.

एका चॉकलेटसाठी कर्मचारी निलंबित

तात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर यांच्यासारख्या नेत्यांनी संघाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले, त्यामागे त्यांचा त्याग होता, कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त होती. मेडिकलच्या दुकानात सुटे पैसे नसले तरी ग्राहकांना चॉकलेट दिले जात होते. त्या चॉकलेटच्या बरणीतील एक चॉकलेट कमी होते, म्हणून बाबा नेसरीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला एक दिवस निलंबित केले होते.

शाखा दुरुस्तीच्या नावाखाली ३६ लाख खर्च

संघाने नंदगाव येथे नऊ लाखांचे शेड उभा केले. वास्तविक टेंडर काढून ही प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र, आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम दिले. गेल्या वर्षभरात शाखा दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल ३६ लाख भांडवली खर्च पडल्याचे समजते.

कोट-

गुळापोटी सगळ्यांनाच ॲडव्हांस दिले जाते, ‘त्या’ संचालकाचे ११ लाख थकीत होते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी पैसे भरले आहेत, साडेचार लाख व्याजमाफीसाठी त्यांनी अर्ज केला आहे.

- जी. डी. पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघ