शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा; माजी नगरसेविकेचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 23:09 IST

२७ गावांची पाणीबिले थकली आहेत. केडीएमसीने २०१६ मध्ये २७ गावांच्या पाणीबिलापोटी पाच कोटींचा भरणा एमआयडीसीकडे केला होता.

डोंबिवली : तापमानाचा पारा वाढत असताना कल्याण ग्रामीणमधील बहुतांश गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. डोंबिवलीतील सांगाव-सांगर्ली प्रभागातील नागरिक टंचाईने हैराण झाले आहेत. पाणीसमस्या सोडवावी, यासाठी तेथील भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी वारंवार शहरातील एमआयडीसीच्या कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला. मात्र, एमआयडीसीने त्याला केराची टोपली दाखविल्याने पाटील यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांना पाणीकपात रद्द न केल्यास आणि पाण्याचे समान वितरण न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा पत्राद्वारे गुरुवारी दिला आहे.

एमआयडीसी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील पाणीबिल थकबाकीचा अनेक वर्षांपासून तिढा सुटत नसल्याचा फटका बसत आहे.  रहिवासी घराबाहेर पहाटे चार वाजता नळावर पाणी भरण्यासाठी रांग लावतात. टँकरने पाणी मागवावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती असल्याने नागरिक लोकप्रतिनिधींना जाब विचारतात, त्यांना उत्तर काय देणार, असा सवाल पाटील यांनी केला.

२७ गावांची पाणीबिले थकली आहेत. केडीएमसीने २०१६ मध्ये २७ गावांच्या पाणीबिलापोटी पाच कोटींचा भरणा एमआयडीसीकडे केला होता. उर्वरित ४१८ कोटी थकीत आहेत. थकबाकी व नियमित देयकांचा भरणा होत नसल्याने एमआयडीसीने २७ गावांत कपात करावी लागत असल्याचे केडीएमसीला पत्राद्वारे कळविले आहे. २७ गावे मनपात समाविष्ट झाल्यानंतर त्यांना पाणी, रस्ते आणि इतर सुविधा मिळवून देणे ही  मनपाची जबाबदारी आहे, असे पाटील म्हणाल्या. मनपा यातून मार्ग काढण्याऐवजी पाणीबिल थकवत आली आहे. पाच वर्षे मनपा हेच करीत आल्याने गावांना  कपातीचा सामना करावा लागत आहे. नागरिक लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारत आहेत. लोकप्रतिनिधी एमआयडीसी, तर कधी मनपा कार्यालयात हेलपाटे मारतात. मात्र, थकबाकी भरत नाही, तोपर्यंत पाणीकपात करीत राहणार, अशी एमआयडीसीची भूमिका असल्याचे समजले. त्यामुळे या सर्वांवर तत्काळ उपाययोजना करा, अन्यथा पाण्यासाठी आत्मदहन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

२७ गावांत पाणीपुरवठा कमी हाेत आहे हे आम्ही एमआयडीसीला पत्रांद्वारे वेळाेवेळी कळविले आहे. ती यंत्रणादेखील सर्व प्रयत्न करत आहे. थकीत पाणी बिल आणि पाणी कमी दाबाने येणाचा काही संबंध असेल असे वाटत नाही. - राजीव पाठक, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग, केडीएमसी

टॅग्स :Waterपाणी