शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेची कारवाई केवळ कागदावरच, स्काय डोम हॉल आणि स्पेक्ट्रम रेसिडेन्सीचा वाद चव्हाट्यावर

By सदानंद नाईक | Updated: April 21, 2026 17:51 IST

- सदानंद नाईक  लोकमत न्यूज नेटवर्क   उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील 'स्काय डोम हॉल'चे तब्बल साडेतीन हजार चौरस मीटरचे ...

- सदानंद नाईक लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : कॅम्प नं-३ येथील 'स्काय डोम हॉल'चे तब्बल साडेतीन हजार चौरस मीटरचे अवैध बांधकाम आणि रस्त्यात अडथळा ठरणारी 'स्पेक्ट्रम रेसिडेन्सी' सध्या शहरात चर्चेचा विषय बनली आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने 'कारणे दाखवा' नोटिसा बजावूनही प्रत्यक्षात कारवाई ठप्प असल्याने, या अनधिकृत बांधकामांना नेमका कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. 

उल्हासनगर शांतीनगर येथील स्काय डोम हॉलमध्ये विनापरवाना साडेतीन हजार चौरस मीटरचे वाढीव बांधकाम झाल्याची तक्रार नगररचना विभागाकडे प्राप्त झाली होती. तत्कालीन सहाय्यक संचालक ललित खोब्रागडे यांनी यावर कारवाईचे आदेश दिले होते. अतिक्रमण विभागाने काही प्रमाणात हातोडा चालवला खरा, मात्र 'सुधारित विकास आराखडा' सादर करण्याच्या नावाखाली ही कारवाई अर्धवट सोडण्यात आली. पुन्हा एकदा नोटीस बजावूनही परिस्थिती जैसे थे असल्याने महापालिकेच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तसेच कॅम्प नं-२ मधील स्पेक्ट्रम रेसिडेन्सी ही इमारत थेट रस्त्याच्या जागेत बाधित होत असल्याचे समोर आले आहे. 

महापालिकेने या इमारतीला नोटीस दिली असली, तरी तिथे फ्लॅटची विक्री जोमाने सुरू आहे. भविष्यात खरेदीदारांची फसवणूक झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य जनतेचा कष्टाचा पैसा अडकण्यापूर्वीच पालिकेने कठोर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रशासन सुस्त का, असा सवाल केला जात आहे. उल्हासनगरातील या अवैध बांधकामांच्या मागे शहरातील मोठे राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक आणि पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे 'कलेक्टर' आणि 'नगररचना' नियमांना हरताळ फासला जात असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. 

सर्वेक्षण केल्यास मोठा घोटाळा उघड होणार? महापालिका आयुक्तांनी जर शहरात नव्याने उभ्या राहिलेल्या सर्व बांधकामांचे आणि त्यांना मिळालेल्या परवानग्यांचे सखोल सर्वेक्षण केले, तर नगररचना विभागातील एक मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

नागरिकांची मागणी सर्वसामान्य माणसाने विटा रचल्या तरी प्रशासन धावून येते, मग या बड्या धनदांडग्यांच्या साडेतीन हजार मीटरच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न विचारला जात असून, आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन अनधिकृत बांधकामांचा हा प्रश्न निकाली लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. 

दोन्ही बांधकामाला नोटीसा महापालिका नगररचनाकार विभागाने दोन्ही बांधकामाला नोटीसा देऊन, कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. (विकास बिरारी, नगररचनाकार महापालिका)

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Municipality's Inaction: Sky Dome Hall, Spectrum Residency Controversy

Web Summary : Ulhasnagar's Sky Dome Hall's illegal construction and Spectrum Residency's road obstruction spark controversy. Despite notices, inaction fuels suspicion of political patronage, raising questions about potential buyer fraud and demanding accountability from authorities. A survey could expose a significant planning department scam.
टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर