अंबरनाथमध्ये भर दिवसा दोघांना गंभीर जखमी करून घरफोडी; पोलिसांत गुन्हा दाखल
By पंकज पाटील | Updated: July 13, 2025 00:15 IST2025-07-13T00:15:33+5:302025-07-13T00:15:33+5:30
दरोड्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये भर दिवसा दोघांना गंभीर जखमी करून घरफोडी; पोलिसांत गुन्हा दाखल
अंबरनाथ: अंबरनाथ शिवगंगानगर परिसरामध्ये एका इमारतीत सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील दोघांना गंभीर दुखापत करीत घफोडी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवगंगा नगरमधील शिव श्रद्धा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरात हा प्रकार घडला आहे. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात हेल्मेट घालून प्रवेश केला आणि घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरीला विरोध करणाऱ्या राजेश गायकवाड यांना चोरट्याने गंभीर दुखापत केली. एवढेच नव्हे तर डोक्यात हातोडीचे वार करून घरच्यांना कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रुचिरा गायकवाड यांना कळतात त्या बाथरूममध्ये बाहेर येताच चोरट्यांचा आणि त्यांचे दीर यांची झटापटी सुरू असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर त्यांच्या समोरच चोरट्यांनी दिराला गंभीर दुखापत केली होती. हा प्रकार रोखण्यासाठी स्वतः त्या पुढे गेल्यावर चोरट्यांनी त्यांना देखील डोक्यावर गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून चोरट्याने प्रतिकार होत असल्याचे लक्षात येताच घरातून पळ काढला. दोन्ही जखमींना अंबरनाथच्या जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.