शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेन खुल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:53 IST

काम अंतिम टप्प्यात : आयुक्तांनी केली पाहणी : जूनच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडी पुलाच्या सहापैकी दोन लेन येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे.  या दोन लेनचे काम अंतिम टप्प्यात असताना कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी पाहणी केल्यानंतर ही माहिती देण्यात आली. यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, नगररचनाकार रघुवीर शेळके आदी उपस्थित होते. 

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पूल हा दोन लेनचा होता. युती सरकारच्या काळात त्याचे बांधकाम करण्यात आले होते. सध्या अस्तित्वात असलेला पूल हा वाहतुकीसाठी अपुरा पडत होता. याच पुलाला समांतर सहा पदरी दुर्गाडी खाडी पुलाला २०१६ मध्ये मंजुरी दिली गेली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले होते. पुलाच्या कामासाठी नेमलेल्या कंत्राटदाराकडून दिरंगाई होत असल्याने त्याला दिलेले कंत्राट दोन वर्षांनंतर रद्द केले. नंतर १०१ कोटी रुपये खर्चाचे सहा पदरी पुलाचे काम तांदळकर आणि थोरात कंपनीला दिले. या कंपनीने रायगड येथील सावित्री पूल तयार केला होता. त्या कंपनीने पुलाचे काम युद्धपातळीवर उचलले. मात्र, २०१९ मध्ये अतिवृष्टीचा बसलेला फटका आणि त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे पुलाच्या कामाची गती मंदावली होती. सहापैकी दोन लेन जूनच्या पहिल्या आठवड्यात खुल्या झाल्यावर जुना दोन लेनचा पूल आणि नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या दोन लेन अशा चार लेन वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर उर्वरित चार लेनही भविष्यात खुल्या केल्या जातील. भिवंडी-कल्याण-शीळ रोडवरील दुर्गाडी खाडी पूल हा महत्त्वाचा पूल आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणचा पत्री पूल मार्गी लागला. त्यापाठोपाठ दुर्गाडीच्या दोन लेन खुल्या होत असल्याने वाहतूक कोंडीचा महत्त्वाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

रिंग रोडच्या कामासाठी एमएमआरडीएने मागितले पोलीस संरक्षण

दुर्गाडी खाडी पुलाच्या कामाची पाहणी केल्यावर महापालिका आयुक्तांनी कल्याण रिंग रोडच्या दुर्गाडी ते मांडा टिटवाळादरम्यानची पाहणी केली. रिंग रोडचे या टप्प्यातील  ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. 

मात्र, काही ठिकाणी अडथळे आहेत. रिंग रोडचे काम ज्या ठिकाणी पूर्णत्वास आले आहे त्याचा वापर सुरू झाला आहे. झालेले काम जून महिन्यापर्यंत महापालिकेस हस्तांतरित केले जाईल. 

ज्याठिकाणी कामाला विरोध आहे. त्यासाठी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी एमएमआरडीएच्या वतीने रेलकॉन कंत्राटदार कंपनीने पोलीस व महापालिका प्रशासनाकडे केली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याण