शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 08:28 IST

देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला.

डोंबिवली : देवीच्या भंडाऱ्याला गेलेल्या आयुष कदम (१३) याचा २० फूट नाल्याच्या उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. डोंबिवली पश्चिमेकडील सरोवरनगर परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. नाल्याच्या कामाच्या ठिकाणी चेंबर कोणी उघडे  ठेवले? याचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली. 

जगदंबा मंदिराकडून नवरात्रोत्सवात नऊ दिवस भंडारा दिला जातो. तेथील चाळीत राहणारा आयुष भंडाऱ्याला गेला होता. त्या परिसरात एमएमआरडीएच्या वतीने रिंगरूट मार्गाचे काम सुरू असून, या अंतर्गतच नाला बांधणीचे कामही सुरू आहे. नाल्यावरील चेंबरचे झाकण तुटलेले होते. भंडाऱ्यानिमित्त भांडी घासताना अन्न खरकटे नाल्याच्या पाण्यात टाकण्यासाठी  झाकण सरकवले होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्री उघड्या चेंबरचा अंदाज न आल्याने आयुषचा पाय घसरल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

२५ लाखांची आर्थिक मदत करा

मुलाच्या मृत्यूला एमएमआरडीए , कंत्राटदार व केडीएमसी जबाबदार असल्याचा आरोप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला. कदम कुटुंबाला २५ लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी म्हात्रेंनी केली. शिंदेसेनेचे उपशहरप्रमुख गोरखनाथ (बाळा) म्हात्रे यांनीही  दोषींवर कारवाईची मागणी केली. ही बेफिकीर प्रशासनाने केलेली हत्या असल्याचा आरोप मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा आहे. 

२ तासांनंतर आयुषचा मृतदेह काढला बाहेर

आयुष नाल्यात पडल्याचे समजताच तातडीने परिसरातील तरुणांनी अग्निशमन विभागाला बोलावले. मात्र संबंधित विभागाने टॉर्चच्या मदतीने शोध घेण्यापलीकडे काहीही हालचाल केली नाही, असा आरोप रहिवाशांचा आहे. दरम्यान, परिसरात राहणाऱ्या वेदांत जाधवने खोल नाल्यात उडी मारली. तब्बल दोन तासांनंतर रात्री १२ ते साडेबाराच्या दरम्यान आयुषचा मृतदेह घटनास्थळापासून सुमारे ३०० फुटांवर सापडला.

English
हिंदी सारांश
Web Title : Boy Dies After Falling into Drain During Bhandara in Dombivli

Web Summary : A 13-year-old boy died in Dombivli after falling into an open drain while attending a Bhandara. Locals demand action against those responsible for the open chamber. Authorities are blamed and financial assistance is requested for the family.
टॅग्स :Accidentअपघातdombivaliडोंबिवली