शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम! डोंबिवलीत जेव्हा ठाकरे गट अन् शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी एकत्र येतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 00:11 IST

पक्षफुटीनंतरचे हेवेदावे बाजूला सारत दोन्ही गटाचे पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले

मयुरी चव्हाण काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण डोंबिवली: शहर आणि इथले राजकारण कायमच संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षफुटीनंतर सर्वाधिक पडसाद कल्याण डोंबिवलीत उमटले. अगदी मध्यवर्ती शाखेच्या ताब्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र डोंबिवलीतल्या राजकीय वर्तुळात रविवारचा दिवस हा काहीसा गंमतीशीर आणि राजकारणापलीकडचा ठरला.याचं कारण म्हणजे ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी विविध खाजगी कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेच्या जुन्या आठवणींचा उल्लेख करत दोन्ही शिवसेनेच्या गटात गप्पा रंगल्या.

रविवारी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डोंबिवलीतील ठाकरे गटाचा प्रमुख चेहरा अशी ओळख असलेले सदानंद थरवळ आणि इतर पदाधिकारी म्हात्रे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी जुनी शिवसेना, त्यावेळचे इतर गंमतीदार किस्से इत्यादी गोष्टींचा उल्लेख करत अनेक जुन्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

दुसरीकडे  शिंदेंच्या शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांचाही वाढदिवस होता. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मध्यवर्ती शाखेमध्ये मोठी गर्दी झाली होती. ठाकरे गटाचे मुकेश पाटील यांनीही शाखेमध्ये येत राजेश मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पक्षफुटीनंतर कितीही आरोप प्रत्यारोप हेवेदावे झाले असले तरी रविवारी मात्र दोन्ही ठिकाणी सर्व गोष्टी बाजूला सारत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी हसतमुखाने एकमेकांना भेटले.

आता या भेटी खाजगी असल्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय जोडे बाजूला ठेवून दोन्ही पक्षाचे पदाधिकारी केवळ मैत्रीखातर एकमेकांना मदत करणार का? अशा एक ना अनेक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेdombivaliडोंबिवली