उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाचा अजब कारभार; ३ महिन्यापूर्वी बांधलेला सिमेंट रस्ता गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 20:24 IST2026-05-11T20:24:32+5:302026-05-11T20:24:32+5:30

स्थानिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. 

strange conduct of ulhasnagar municipal corporation construction department cement road built 3 months ago dug up to lay sewer pipe | उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाचा अजब कारभार; ३ महिन्यापूर्वी बांधलेला सिमेंट रस्ता गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदला

उल्हासनगर महापालिका बांधकाम विभागाचा अजब कारभार; ३ महिन्यापूर्वी बांधलेला सिमेंट रस्ता गटारीचे पाईप टाकण्यासाठी खोदला

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : आधी रस्ता बांधायचा आणि मग गटारासाठी तोच रस्ता उखडायचा, असा काहीसा अजब आणि संतापजनक प्रकार कॅम्प नं-४ मधील दहा चाळ परिसरात उघड झाला. महापालिका बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाखो रुपयांचा निधी अक्षरशः मातीत गेला असून, स्थानिकांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, दहा चाळ परिसरात गेल्या ३ महिन्यांपूर्वीच सिमेंट काँक्रिटचा रस्ता बांधण्यात आला होता. स्थानिक नागरिकांना वाटले होते की आता चिखल आणि खड्ड्यांतून सुटका होईल. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. रस्त्याखालून भुयारी गटाराचे पाईप टाकण्याचे 'विस्मरण' झालेल्या ठेकेदार आणि प्रशासनाला अचानक जाग आली आणि अवघ्या ९० दिवसांत सुस्थितीत असलेला रस्ता मशीन लावून उखडण्यात आला. सध्या शहरांत ४५० कोटींच्या भुयारी गटार योजनेसह एमएमआरडीए, शासन आणि विविध लोकप्रतिनिधींच्या निधीतून विकासकामांचा धडाका सुरू आहे. मात्र, एक हात काय करतोय हे दुसऱ्या हाताला माहीत नाही अशी स्थिती बांधकाम विभागात पाहायला मिळत आहे. 

दहा चाळ येथील रस्ता खोदल्यामुळे येथील रहिवाशांना आपल्या गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत आहेत. खोदलेल्या ढिगाऱ्यांमुळे वृद्ध आणि लहान मुलांना चालणेही मुश्कील झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना, पुन्हा चांगल्या रस्त्यांची ही अवस्था पाहून संताप व्यक्त होत आहे. महापालिकेचा हा 'खोदकाम' उद्योग म्हणजे नियोजनाचा अभाव की टक्केवारीचे गणित? असा सवाल आता सामान्य जनता विचारत आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही जर नागरिकांना सुविधांऐवजी समस्याच मिळणार असतील, तर या विकासाचा उपयोग काय, असा टोलाही लगावला जात आहे. 

हा जनतेच्या कष्टाच्या पैशाचा अपव्यय आहे. रस्ता बांधताना प्रशासनाला गटाराची आठवण झाली नाही का? महासभेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला जाईल आणि दोषींवर कारवाईची मागणी केली जाईल.  (विकास खरात, स्थानिक नगरसेवक)

Web Title : उल्हासनगर नगर पालिका का अजीब काम: हाल ही में बनी सड़क खोद डाली।

Web Summary : उल्हासनगर के निवासियों को परेशानी का सामना करना पड़ रहा है क्योंकि खराब योजना के कारण पूरा होने के तीन महीने बाद ही एक नई बनी सड़क को ड्रेनेज पाइप के लिए खोद दिया गया था। सड़क के काम से बड़ी असुविधा हुई है, जिससे धन के कुप्रबंधन के बारे में सवाल उठ रहे हैं।

Web Title : Ulhasnagar Municipality's bizarre work: Road dug up after recent construction.

Web Summary : Ulhasnagar residents face hardship as a newly built road was dug up for drainage pipes just three months after completion due to poor planning. The road work has caused major inconvenience, raising questions about fund mismanagement.