शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात पाच रुपयांची कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:37 IST

कल्याण ते उल्हासनगर कॅम्प नं. ३ मार्ग : अघोषित भाडेवाढीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : उल्हासनगर कॅम्प नं. ३ ते कल्याणदरम्यान शेअर रिक्षाच्या प्रति प्रवासी भाड्यात गुरुवारपासून पाच रुपये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता २५ ऐवजी २० रुपये आकारले जाणार आहेत. अनलॉकमध्ये जूनपासून रिक्षा सुरू झाल्या. तेव्हापासून कल्याण आरटीओ क्षेत्रात अशा प्रकारची अघोषित भाडेवाढ करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे आरटीओने दुर्लक्ष केले आहे.

कोरोनापूर्वी कल्याण ते उल्हासनगर कॅम्प नं. ३ दरम्यानचे प्रति प्रवासी भाडे १७ रुपये होते. अनलॉकमध्ये दोन प्रवाशांसह रिक्षा व्यवसायास परवानगी देण्यात आली. एका सीटचे नुकसान टाळण्यासाठी रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी २५ रुपये भाडे आकारणे सुरू केले. कल्याण स्थानकातील रिक्षा स्टॅण्ड बुधवारी सुरू होताच गुरुवारपासून या मार्गावरील भाडे पाच रुपयांनी कमी करण्यात आले. मात्र, आता तीन प्रवासी घेतले जाणार आहेत. कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव व दुसरीकडे १६ जानेवारीपासून सुरू होणारे लसीकरण, याचा परिणाम म्हणून भाड्यात कपात केल्याचे रिक्षाचालकांनी सांगितले.कल्याणच्या मुख्य रिक्षा स्टॅण्डवरून उल्हासनगर कॅम्प नं. १, २, ३ करिता शेअर रिक्षा सुटतात. त्यामुळे कॅम्प नं. ३ प्रमाणे सर्वच मार्गांवरील शेअरचे भाडे कमी करण्याची गरज व्यक्त होत आहे. कल्याण-खडकपाडा, लालचौकी, योगीधाम, बिर्ला कॉलेज, दुर्गाडी, रेतीबंदर, मेट्रो मॉल या मार्गावरील भाड्यातही अघोषित भाडेवाढ करण्यात आली होती. आरटीओने त्याविरोधात कोणतीच कारवाई केलेली नाही.

कल्याण-डोंबिवली भाड्यात दुपटीने वाढ nकल्याण ते डोंबिवली या सहा किलोमीटरसाठी कोरोनापूर्वी प्रति सीट भाडे २५ रुपये आहे. मात्र, अनलॉकमध्ये त्यात दुपटीने वाढ करीत ५० रुपये आकारले जात आहेत.nकल्याण-टिटवाळा प्रति प्रवासी ७० रुपये घेतले जात आहेत. सर्वांसाठी लोकल सुरू होत नाही, तोपर्यंत या अघोषित भाडेवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागणार आहे, असे बोलले जात आहे.

 

टॅग्स :kalyanकल्याणauto rickshawऑटो रिक्षा