राणा श्वानाची कमाल: कसाऱ्यात रेल्वेची सिग्नल केबल चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:05 PM2021-09-04T20:05:54+5:302021-09-04T20:06:25+5:30

आरपीएफ अधिकाऱ्यांनी केले कौतुक.

Railway signal cable thief arrested in 24 hours in Kasara rana dog helped to find | राणा श्वानाची कमाल: कसाऱ्यात रेल्वेची सिग्नल केबल चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

राणा श्वानाची कमाल: कसाऱ्यात रेल्वेची सिग्नल केबल चोरणाऱ्यास २४ तासांत अटक

Next
ठळक मुद्देआरपीएफ अधिकाऱ्यांनी केले कौतुक.

डोंबिवली: कसारा घाटातील जंगल भागात रेल्वे रुळालगत असलेली सिग्नल केबल तोडून चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्या चोराचा शोध अवघ्या २४ तासांत शनिवारी कसारा रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) पथकाने राणा नामक श्वानाच्या मदतीने लावला आणि त्या चोराला जेरबंद करण्यात आले. 

यासंदर्भात माहिती देतांना आरपीएफ कसाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमान सिंग म्हणाले की, सिग्नल केबल चोरी करून ग्यानेश्वर टोकरे हा चोर नजीकच्या जंगलात अनोळख्या ठिकाणी झोपडीत लपला होता. त्याला राणा नामक श्वानाने कर्तव्यावर येऊन शोध चोराचा नेमका शोध घेतला. त्यामुळे त्याचे कौतुक करणे महत्वाचे आहे. राणा हा आमच्या स्टाफचा सदस्य आहे. त्याच्यामुळे तातडीने शोध लागला आणि चोरीचा उलगडा झाला. त्या चोराकडून कुऱ्हाड आणि तोडून चोरलेली केबल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे शनिवारी संध्याकाळी सांगितले. 

भारतीय रेल्वेच्या कायद्यानुसार संबंधित चोरावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ही सिग्नल केबल खूप महत्त्वाची असते, ती तोडल्याने रेल्वे सेवेवर परिणाम।झाला नसला तरी त्या चोराचा शोध लागणे हे आरपीएफ पथकाला आव्हान असते. पण राणा श्वानाच्या अमूल्य योगदनामुळे अवघ्या काही तासात त्या चोराचा शोध लागला आणि चोरी पकडली गेली.

Web Title: Railway signal cable thief arrested in 24 hours in Kasara rana dog helped to find

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.