अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 09:13 IST2024-09-26T09:13:46+5:302024-09-26T09:13:54+5:30

पोलिसांनी बदलापुरातील शिंदेच्या घराबाहेर पोलिस पहारा ठेवला आहे.

Protests against Akshay Shinde cremation | अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध

अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्काराला विरोध

बदलापूर : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने आणि त्याच्या वडिलांनी मुलाच्या एन्काउंटरविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने पोलिसांनी बदलापुरातील शिंदेच्या घराबाहेर पोलिस पहारा ठेवला आहे.

गेल्या महिनाभरापासून शिंदेचे घर बंद होते. मात्र, पोलिसांनी शिंदे याचा एन्काउंटर केल्यानंतर आता त्याचे कुटुंबीय बदलापुरातील घरी आले आहेत. अक्षयच्या मृतदेहावर बदलापुरात अंत्यसंस्कार होणार असल्याची चर्चा सुरू होताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला विरोध केला. पोलिसांच्या चकमकीला आव्हान देणारी याचिका अक्षयच्या वडिलांनी दाखल केल्याने समाजमाध्यमांवर तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर पोलिसांनी अक्षयच्या घरासमोर बंदोबस्त ठेवला आहे. 
 

Web Title: Protests against Akshay Shinde cremation