शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 18:58 IST

Uddhav Thackeray : एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

कल्याण - एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. केंद्राकडे राज्याचे अनेक प्रकल्प रखडलेले आहे. त्यात अडथळे निर्माण करुन राज्यातील विकास कामे होत नसल्याची टिका भाजप करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा टोला भाजलपा लगावला आहे. कल्याणमधील बहुचर्चित नव्या पत्री पूलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स जनतेसी संवाद साधला.या प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपील पाटील,शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार, माजी महापौर विनिता राणो, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. मागच्या सरकारच्या काळात कामे होत होती असे बोलून आताचे सरकार काय करीत आहे असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी मागचे सरकार हे बोलाचाच भात आणि बोलाची कढी होते. पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आल्याने महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे.विकास कामावरुन शिवसेना भाजपमध्ये टक्के टोमणे आणि टीकाबाजीकल्याण-पत्री पूलाच्या कार्यक्रमात खासदार कपील पाटील यांनी पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचबरोबर ठाणो-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणो ते भिवंडी दरम्यान प्रगती पथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे उपस्थित केले. पालकमंत्री या नात्याने या लक्ष्य घालणाची मागणी पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी व राज्य आणि महापालिकेचा निधी मिळून हे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूका आल्यावर वाटप सुरु करु नका असा टोला शिवसेनला लगावला. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर देताना यापूर्वी ६ हजार ५०० कोटीचा निधी देण्याचे सांगण्यात आले. निवडणूकीत वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणूकीपूरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा असा सल्ला भाजपला दिला. तसेच पाटील यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेत आम्ही चांगली कामे केली आहेत. ती जनतेसमोर आहेत असे वक्तव्य केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाkalyanकल्याण