शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

अर्धा एकर जमिनीसाठी चुलत भावाचा खून, आरोपीला पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 09:25 IST

झारखंडमधून एकाला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गावातील २० गुंठे जमिनीच्या वादातून दोघा भावांनी चुलत भावाची दगडाने प्रहार करून, खून केल्याचा प्रकार मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पुरण सिकंदर महतो (वय ४७) असे मृत भावाचे नाव आहे, तर खून करणाऱ्या दोघांपैकी कालुकुमार सीताराम महतो याला झारखंड येथून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, त्याचा भाऊ लालुकुमार सीताराम महतो हा फरार आहे. 

कालुकुमारला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला  स्थानिक ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले, हल्लाही झाला, परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस आरोपीला ताब्यात घेत डोंबिवलीत घेऊन आले. मूळचे झारखंड येथील रहिवासी असलेले पुरण हे मजुरीचे काम करण्यासाठी डोंबिवलीतील गोळवली गावात वास्तव्याला होते, तर त्यांचे चुलत भाऊ कालुकुमार आणि लालुकुमार हे दोघेही गोळवलीत इतर ठिकाणी राहात होते. पुरणचा त्याच्या चुलत भावांशी जमिनीवरून वाद होता. या वादातून झारखंडमध्ये त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हेही दाखल आहेत. दरम्यान, पुरणचा काटा काढून हा वाद कायमचा संपवायचा असा डाव भावांनी आखला. 

कालुकुमार आणि लालुकुमार यांनी ४ नोव्हेंबरला रात्री पुरणला घरी जेवायला बोलावले. त्याला दारू पाजली. यावेळी जमिनीचा विषय उकरून काढत भांडण केले आणि मारहाण केली. डोक्यात दगड घातल्याने पुरण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर हल्ला करून दोघेही पळून गेले. बेशुद्ध अवस्थेत पुरण हा आढळला. याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी पुरणला सायन रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पुरणचा ८ नोव्हेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला.

सोमवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडीगोळवलीत पोलिसांनी चौकशी केली असता, त्याच्या चुलत भावांची आणि जमिनीच्या वादाची माहिती मिळाली, तसेच ते झारखंड येथील मूळ गावी गेल्याची माहिती मिळताच, डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त जे.डी. मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक झारखंडला रवाना झाले आणि त्यांनी कालुकुमारला बेड्या ठोकल्या. त्याला सोमवार, २२  नोव्हेंबरपर्यंत कल्याण सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस