कल्याण : कल्याण - डाेंबिवली महापालिकेच्या स्थायी, महिला व बालकल्याण आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची सोमवारी महासभेत नियुक्ती करण्यात आली. शिंदेसेनेला पाठिंबा देणाऱ्या मनसेला तिन्ही समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्धवसेनेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी तिन्ही समित्यांवर नियुक्त झाला आहे.
मनसेने उद्धवसेनेबरोबर युती करून पालिका निवडणूक लढविली. मात्र, निवडणुकीनंतर शिंदेसेनेच्या शिवआघाडीत मनसेचे ५ नगरसेवक सहभागी झाले. त्यामुळे स्थायी, महिला व बालकल्याण व शिक्षण समितीत शिवआघाडीचे सदस्य नियुक्तीसाठी लागणारे जास्तीचे ताैलनिक संख्याबळ मिळाले. स्थायी समितीत १६ सदस्यांची नियुक्ती झाली आहे.
त्यात शिंदेसेनेचे गजानन पाटील, महेश गायकवाड, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे आणि मनसेचे गणेश लांडगे, भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनीषा गायकवाड, मुकुंद पेंडणेकर, नंदू म्हात्रे, उपेक्षा भोईर, उद्धवसेनेचे विशाल गारवे यांची नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीतील विकास प्रकल्पांसाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ४ हजार कोटी रुपये खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणल्याबद्दल महासभेत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला.
विकास निधी चार हजार कोटीविकास प्रकल्पांसाठी ४ हजार ८०० कोटी मंजूर केल्याबद्दल खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सत्काराची सूचना शिंदेसेनेचे नगरसेवक नीलेश शिंदे यांनी केली. त्याला मंजुरी दिली. शिंदेसेनेचे गटनेते विश्वनाथ राणे आणि उपमहापौर राहुल दामले यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.
‘महिला बाल कल्याण’ मध्ये ११ सदस्यमहिला बाल कल्याण समितीमध्ये ११ सदस्यांची नियुक्ती झाली. त्यात शिंदेसेनेच्या रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेच्या रसिका पाटील, भाजपच्या मेघाली खेमा, पूजा गायकवाड, सराेज राय, सुनीता पाटील, रविना माळी, उद्धवसेनेच्या तेजश्री गायकवाड यांचा समावेश आहे. शिक्षण समिती सदस्यपदी शिंदेसेनेचे प्रतीक पेणकर, अनघा देवळेकर, शालिनी वायले, दीपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपचे अभिजीत थरवळ, जतीन प्रजापती, कविता म्हात्रे, श्यामल गायकर, रसिका पाटील, उद्धवसेनेच्या अर्पण भाेईर यांचा समावेश झाला.
सभागृहनेतेपदी भाजपचे वरुण पाटीलमहापालिकेच्या सभागृह नेते पदी भाजपचे वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली आहे.
Web Summary : MNS representatives secured positions on KDMC committees, backing Shinde's Shiv Sena. Shiv Sena alliance gains majority. Development projects worth ₹4,000 crore approved.
Web Summary : मनसे प्रतिनिधियों ने केडीएमसी समितियों में स्थान हासिल किया, शिंदे की शिवसेना का समर्थन किया। शिवसेना गठबंधन को बहुमत मिला। ₹4,000 करोड़ की विकास परियोजनाओं को मंजूरी।