शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:10 IST

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे.

अनिकेत घमंडीडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजप व शिंदेसेनेनी विरोधी उद्धवसेना, मनसे व काँग्रेस या पक्षांना खिंडार पाडले आहे. उद्धवसेनेचे नेते दीपेश म्हात्रे, मनसेचे माजी नगरसेवक यांच्यानंतर आता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सचिन पोटे यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू आहे. सत्ताधारी महायुतीच्या विरोधातील चार लाख मतदारांना मतदानाकरिता संधीच ठेवायची नाही. त्यामुळे विरोधी विचारांचे मतदार मतदानाकरिता घराबाहेर पडणार नाहीत व महायुतीचेच मतदार मतदानाला घराबाहेर पडून भाजप किंवा शिंदेसेना यांना मते देतील, अशी खेळी असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेस, मनसे, शरद पवार गट यांची ताकद नाममात्र झाली. उद्धवसेना सर्व पॅनलमध्ये उमेदवार देऊ शकेल की नाही, अशी स्थिती झाली असून, आता महायुतीच्या बालेकिल्ल्यात भाजप, शिंदेसेनेतच सरळ लढत होणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरातील जवळपास चार लाख मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडायची इच्छा होऊ नये इतके विरोधकांना राजकीयदृष्ट्या विकलांग करण्याची ही खेळी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील भाजपविरोधी मते कदाचित शिंदेसेनेला जातील; कारण महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिंदेसेना हीच विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे. यामुळे अखेरीस महायुतीलाच लाभ होणार आहे. 

उद्धवसेना, काँग्रेस, मनसे पक्षांतील बडे नेते भाजप किंवा शिंदेसेनेत गेले, तर कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होते. निवडणुकीत उमेदवारांना रसद प्राप्त होत नाही. काही वॉर्डांत बिनविरोध निवडणूक होण्याची अथवा उमेदवार तगड्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांकडून मलिदा घेऊन घरी बसण्याची अथवा बसवले जाण्याची शक्यता बळवली आहे. महाविकास आघाडीकडे भाजप, शिंदेसेनेला फाइट देऊ शकेल, असा नेता नसल्याने त्या पक्षांची कोंडी झाली आहे.

सचिन पोटे यांचा राजीनामाकाँग्रेस पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बुधवारी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत सहा पदाधिकाऱ्यांनीही पदाचा राजीनामा दिला. पोटे सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात होते. त्यांनी महापालिकेत काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता आणि गटनेतेपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी जान्हवी पोटे यादेखील नगरसेविका होत्या. पोटे म्हणाले की, माझा जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने मी राजीनामा दिला. मी अद्याप पक्ष सोडलेला नाही. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचाही, कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena's strategy to weaken opposition in Kalyan-Dombivli elections.

Web Summary : BJP and Shinde Sena aim to cripple Kalyan-Dombivli opposition, potentially securing victory. Congress leader Sachin Pote's resignation adds to MVA's woes, paving way for a BJP-Shinde Sena contest.
टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदे