Maharashtra Bandh: कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:05 IST2021-10-11T14:02:52+5:302021-10-11T14:05:17+5:30
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते

Maharashtra Bandh: कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न
कल्याण - लखीमपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज पुकारण्यात आलेल्ल्या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी सकाळपासूनच रस्त्यावर उतरले होते. कल्याण पश्चिमेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने तसेच रास्ता रोकोचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी निदर्शने करणाऱ्यांची समजूत काढत त्यांना बाजूला हटवले.
कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते.सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते.त्यानंतर रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत राष्ट्रवादीतर्फे रास्ता रोकोचाही प्रयत्न करण्यात आला. एकंदरीत दोन्ही शहरात शिवसेनेच्या तुलनेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष पूर्ण सकाळपासूनच पूर्ण ताकदीनिशी पाहायला मिळालं.