शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार कोपर पूल, दिपेश म्हात्रेंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:06 IST

Kopar bridge : पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे.

कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाण पूल गणेश चतुर्थीच्या आधी खुला होणार असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज दिली. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरण्याच्या कामास माजी नगरसेवक म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. 

या प्रसंगी भाजप माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी अशुतोष येवले आदी उपस्थित होते. कोपर पूल हा तयार करुन तो नागरीकांना 15 जुलै रोजी खुला केला जाईल अशी डेडलाईन प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. पूलाच्या कामासाठी ऑक्सीजनची कमतरता भासल्याने पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. आता या पूलाच्या कामाला गती देण्यात आली आहे. पूल वाहतूकीसाठी खुला झाल्यावर ठाकूर्ली रेल्वे उ्डाणपूलावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे. 

कोपर हा पूल डोंबिवलीसाठी महत्वाचा पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्याने  रेल्वे आणि महापालिकेने संयुक्तीक निर्णय घेऊन पूल वाहतूकीसाठी बंद केला. त्यानंतर पूलाच्या कामासाठी महापालिका आणि रेल्वेने निम्मा खर्च उचलला. जवळपास 10 कोटी रुपये खर्च करुन हा पूल तयार केला जात आहे. कोरोनामुळे या पूलाच्या कामाचा वेग मंदावला होता. मात्र कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झालेला असताना हा पूल पाडून पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. 

पूलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूलाचा स्लॅब सिमेंट कॉन्क्रीटीकरणाने भरल्यावर पूलाचे काम पूर्णत्वास येईल. त्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी खुला केला जाईल. या पूलाच्या कामावर देखरेख ठेवून असलेले प्रकल्प अभियंते तरुण जुनेजा यांनी सांगितले की, ऑगस्ट अखेर्पयत पूलाची सर्व कामे मार्गी लावली जातील. 

टॅग्स :kalyanकल्याण