शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेसाठी केडीएमसीचा अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी करार

By मुरलीधर भवार | Updated: April 21, 2026 17:49 IST

- मुरलीधर भवार कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देता यासाठी महापालिकेने अंबरनाथच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत ...

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देता यासाठी महापालिकेने अंबरनाथच्या वैद्यकीय महाविद्यालयासोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली थवील, उपमहापौर राहूल दामले, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे, भाजप गटनेते शशिकांत कांबळे, उद्धव सेनेचे गटनेते उमेश बोरगावकर, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, का’ग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी आदी उपस्थित होते.महापालिकेचे कल्याण पश्चिमेती रुक्मीणीबाई रुग्णालय, गौरीपाडा रुग्णालय, कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णलयात आरोग्य सेवा देण्याचा हा सामंजस्य करार आहे. अंबरनाथमधील १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्न ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष रुग्णालयीन सेवा अनुभव मिळण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार सात वर्षाकरीता आहे. सगळयात प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालय हे अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न करण्यात येणार आहे. बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथे सर्व विशेषज्ञ बाह्यरुग्ण सेवा सुरु करण्यात येतील. त्यानंतर अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे. अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर आवश्यक अध्यापकीय, तांत्रिक आणि अतांत्रिक अधिकारी कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर गौरीपाडा रुग्णालयाची इमारत ताब्यात घेऊन स्त्री रोग आणि बालरोग तज्ञ हे विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. त्यानंतर कल्याण पूर्वेतील शक्तिधाम रुग्णालयाच्या इमारतीचे आरक्षण बदल झाल्यानंतर हे रुग्णालय ताब्यात घेऊन त्याठिकाणी आराेग्य सेवा देणारे विविध विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

महापालिकेची रुग्णालये अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न झाल्यावर वैद्यकीय महाविद्यालयामार्फत तज्ञ वैद्यकीय. अधिकारी आणि इतर मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यांच्यामार्फत प्रगत वैद्यकीय सुविधा, विशेषज्ञ सेवा आणि अतिदक्षता विभागाची सुविधा महापालिका हद्दीतील नागरीकांना देणे शक्य हेणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC Partners with Ambernath Medical College for Healthcare Improvement

Web Summary : KDMC collaborates with Ambernath Medical College to enhance healthcare services in its hospitals. This seven-year agreement focuses on providing expert medical staff and advanced facilities, starting with Rukmini Bai Hospital, followed by other municipal hospitals, benefiting Kalyan-Dombivli residents.
टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका