शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

वन्य प्राणी रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्रासाठी १०० कोटींचा निधी देणार, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

By मुरलीधर भवार | Updated: August 3, 2024 19:29 IST

Kalyan News: डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले.

- मुरलीधर भवार

कल्याण - डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे नव्याने सुरु करण्यात आलेल्या वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्राचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. तर या ठिकाणी देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेट ऑफ आर्ट असलेले प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. असे आश्वासन खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना दिले.

कल्याण येथील डायघर येथे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रात वन्यप्राण्यांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उभारण्यात आले आहे. तसेच जखमी प्राण्यांच्या शस्त्रक्रियेसाठी देखील सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्या आहेत. वाहनांच्या धडकेत, नैसर्गिक आपत्तीमुळे, विजेचा झटका लागून तसेच काही संरक्षित वन क्षेत्रात घुसखोरी करून वन्य प्राण्यांना तसेच पक्षांना इजा करणाऱ्या काही समाज कंटकांमुळे वन्य जीव अनेकदा जखमी होत असल्याचे निदर्शनास येत असते. या प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू देखील येतो तर काही वन्य प्राण्यांना कायमचे अपंगत्व येते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे वन्यप्राणी रूग्णालय तथा पुनर्वसन केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामुळे केवळ कल्याण, डोंबिवली येथीलच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील वन्य प्राण्यांवर उपचार करणे सुकर होणार आहे. तसेच या ठिकाणी उपचारानंतर प्राण्यांना सुरक्षित पद्धतीने ठेवण्यासाठी पिंजऱ्यांची देखील उभारणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. तर शहरात आढळून येणाऱ्या बिबट्याना जेरबंद करून त्यांना सुरक्षित मिळेपर्यंत काही काळ या केंद्रात ठेवण्यासाठी विशेष पिंजरे देखील या केंद्रात उभारण्यात आले आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांसाठी आधुनिक यंत्रसामग्री, प्रशिक्षित वैद्यकीय कमर्चारी डॉक्टर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. यामुळे उपचारानंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी प्राण्यांना एक सुरक्षित निवारा देखील उपलब्ध झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते याचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. या केंद्राच्या लोकार्पणानंतर सर्व प्राणीप्रेमी कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रसंगी प्रसंगी खासदार शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधत असताना, या ठिकाणी हे रुग्णालय सुरू झाले ही अतिशय उत्तम बाब आहे. मात्र या ठिकाणी राज्यातीलच नव्हे तर देशातील उत्तम दर्जाचे असे स्टेटऑफ आर्ट असलेले प्राणिसंग्रहालय, बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी, अशा सूचना वनविभागासह इतर संबंधित विभागांना दिल्या. परेल येथील शासकीय वन्यप्राणी रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालयाची उभारणी करण्यात यावी. तर भायखळा येथे असलेल्या प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर बचाव आणि पुनर्वसन केंद्राची उभारणी करण्यात यावी. यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून तो लवकरात लवकर सादर करावा. यासाठी गरज पडल्यास १०० कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतुद केंद्र, राज्य सरकार तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने करण्यात येईल. यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि मुंबईतील इतर केंद्रांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही, असे यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी, मुंब्रा शहरप्रमुख राजन किणे, कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, बंडू पाटील, हनुमान ठोंबरे यांच्यासह ठाणे मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, सहायक वनसंरक्षक सोनल वळवी, उप वनसंरक्षक संतोष सस्ते, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले तसेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयाचे डॉ. मंदार गावकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे