शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

कल्याण: अतिधोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात; पालिका आयुक्तांनी दिले होते निर्देश  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 7:44 PM

पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे देण्यात आले होते निर्देश

ठळक मुद्देपावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे देण्यात आले होते निर्देश

कल्याण : कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची पाहणी नुकतीच केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केली होती. अतिवृष्टीच्या काळात दुर्घटना टाळण्यासाठी अतिधोकादायक इमारती तोडण्याचे निर्देशही आयुक्तांनी प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील, वसंत निवास ही अतिधोकादायक इमारती तोडण्याच्या कामास सुरूवात करण्यात आली. 

ही तीन मजली इमारत १९६६ साली बांधण्यात आली होती. या इमारतीला २०१७ पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्यातील व्यावसायिक गाळयांमध्ये वापर सुरू असल्यामुळे त्यांचे पाणी कनेक्शन कट करून व त्यांचा वापर बंद करून आणि दोन रहिवासी यांना रहिवास मुक्त करून निष्कासनाचे काम ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते महापालिकेच्या ३० कामगारांच्या मदतीने सुरू केले असून  इमारतीच्या पूर्ण निष्कासनाची कारवाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल असे केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

जे प्रभागातही उल्हासनगर वालधुनी या रस्त्यांवर असलेली स्वागत गेटची लोखंडी कमान धोकादायक स्थितीमध्ये असल्यामुळे जे प्रभागक्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी उपअभियंता सुनिल वैद्य, तसेच जे प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक पोलीस निरिक्षक सुखदेव पाटील यांच्या मदतीने काढून टाकली. सदर लोखंडी कमानीची विल्हेवाट ही बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार असल्याचं केडीएमसीने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका