शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 06:35 IST

सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उ‌द्भवली होती. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले.

कल्याण : कल्याण शीळ रोडलगत असलेल्या सुरेखा इन्फोटेक या केंद्रावर शुक्रवारी स्टाफ सिलेक्शन कमिशनची न परीक्षा देण्यासाठी मोठ्या संख्येने परीक्षार्थी आले असताना दुपारच्या सत्रात या केंद्रावरील सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. त्यांना पुन्हा परीक्षेची संधी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सगळ्याचा मनस्ताप ■ो परीक्षार्थीना सहन करावा लागला. संतापलेल्या परीक्षार्थीना रोखण्याकरिता अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले.

सर्व्हर डाऊन झाल्याने १७८ परीक्षार्थीना परीक्षा देता आली नाही. जवळपास तीन तास या केंद्रावर गोंधळाची परिस्थिती उ‌द्भवली होती. परीक्षा पुन्हा घेतली जाईल असे सांगितले. ती कधी घेतली जाईल याविषयी सुस्पष्टता नाही. या परीक्षेसाठी देशातील अनेक राज्यांतून परीक्षार्थी आले होते. शनिवारीही या केंद्रावर स्टाफ सिलेक्शनची परीक्षा होती.

परीक्षार्थीच्या केंद्रावर रांगा

सकाळ आणि दुपारच्या सत्रातील परीक्षा पार पडली. मात्र, सायंकाळच्या सत्राकरिता केंद्रावर परिक्षार्थीच्या रांगा होत्या.

ही महत्त्वाची परीक्षा होणार की नाही याची धाकधूक अनेक उमेदवारांत होती. शनिवारी सर्व्हर सुरू असल्याचे सुरेखा इन्फोटेकच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

'त्या' विद्यार्थ्यांना हवी पुन्हा संधी

कल्याण-डोबिवली महापालिकेच्या ४९० पदांसाठी ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान राज्यातील १४ जिल्ह्यांत २५ केंद्रांवर परीक्षा आयोजित केली होती. ९ सप्टेंबरला काही परिक्षार्थीकरिता मुंबईतील पवई येथे परीक्षा केंद्र देण्यात आले होते.

जवळपास १५० पेक्षा जास्त परीक्षार्थी वाहतूक २ कोंडीमुळे परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकले नाही. काही विद्यार्थी केवळ एका सेकंदासाठी उशिरा पोहोचले तरी त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला नाही.

त्यामुळे १५० पेक्षा जास्त परीक्षार्थीची परीक्षा हुकली. त्यांनी परीक्षा देण्याची पुन्हा एक संथी द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. या संदर्भात महापालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाही. हे परीक्षार्थी दररोज महापालिका मुख्यालयासमोर येऊन उभे राहतात.