शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शिरलेल्या घरांना नुकसान भरपाई द्यावी, शिवसेना माजी नगरसेवकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 17:49 IST

Kalyan: नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.

कल्याण : अतिवृष्टीमुळे कल्याण डोंबिवली परिसरातील नदी व खाडी किनारी असलेल्या सखल भागातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरुन नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त घराचे तहसील कार्यालयाने पंचनामे करुन त्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई स्वरुपात आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे.     नदी व खाडी किनारी असलेल्या डोंबिवली खाडी परिसर, मोठा गाव ठाकूर्ली, कोपर परिसरासह कल्याण खाडीलगत असलेला रेतीबंदर परिसर, वालधूनी नजीक असलेल्या योगीधाम, अनुपमनगर, कल्याण पूर्व भागातील कैलासगर, वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले. त्यांच्या घरातील गृहोपयोगी वस्तू, वीजेवर चालणारी उपकरणे आदीचे मोठे नुकसान झाले आले. 

आधीच कोरोनामुळे मेटाकूटीला आलेले नागरीकांचे घर संसार पाण्यात बुडाले. त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी तहसील कार्यालयाने त्या भागातील नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करावे. सव्रेक्षण करुन तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरकारला द्यावा अशी मागणी माजी नगरसेवक म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात तहसील कार्यालयाकडे विचारणा केली असता त्यांनी पावसामुळे घरांचे नुकसान झले असले तरी यापूढेही पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्या येत आहे. मात्र येत्या सोमवारपासून पंचनामे सुरु करण्यात येणार आहेत.

कल्याण डोंबिवली शहराला 2019 साली अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला होता. त्यावेळी तहसील कार्यालयातर्फे पंचनामे करण्यात आाली होते. मात्र नुकसानग्रस्त घरांपैकी केवळ 30 टक्के लोकांना आर्थिक नुकसान भरपाईची रक्कम मिळाली होती. उर्वरीत 70 टक्के नागरीकांना नुकसान भरपाई मिळालीच नाही. ही नुकसान भरपाईची रक्कम आणि आत्ता झालेल्या नुकसानीची रक्कम दिली जावी याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणRainपाऊस