कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा भीषण आग, अग्निशमनच्या चार गाड्या घटना स्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 21:37 IST2022-03-24T21:36:59+5:302022-03-24T21:37:54+5:30
डम्पिंगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला असला तरी डम्पिंग वर सुका कचरा मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे.

कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा भीषण आग, अग्निशमनच्या चार गाड्या घटना स्थळी दाखल
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला आज सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. यावेळी हवेचा वेग अधिक असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले. आगीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाच्या चार गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.
डम्पिंगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला असला तरी डम्पिंग वर सुका कचरा मोठ्या प्रमाणावर आहे यामुळे या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. दरम्यान मागील आठवड्यात देखील आधारवाडी डम्पिंगवर आग लागली होती आता पुन्हा एकदा डम्पिंगवर आग लागल्याने, ही आग लागली की लावण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.